प्रेमीयुगुलाने केली विष पिऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 04:02 PM2018-10-02T16:02:42+5:302018-10-02T16:03:04+5:30
मुरबाडमधील इंदे गावातील बाळाराम वाघ (वय 21) या तरुणाचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातूनच ते दोघे 28 सप्टेंबरपासून बोपत्ता झाले होते. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकांनी टोकावडे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
ठाणे - ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात प्रेमी युगलाने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुरबाडमधील इंदे गावातील बाळाराम वाघ (वय 21) या तरुणाचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातूनच ते दोघे 28 सप्टेंबरपासून बोपत्ता झाले होते. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकांनी टोकावडे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
या प्रकरणी बाळाराम व अल्पवयीन मुलगी रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास टोकावडे पोलीस ठाण्यात हजर झाले. मात्र, पोलीस ठाण्यात जाण्याआधी दोघांनीही विष प्राशन केले होते. विष प्यायल्याचे पोलिसांना कळताच त्यांनी ताबडतोब दोघांना टोकावडे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी त्यांना उल्हासनगर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांवर उपचार सुरु असताना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मुलीचा मृत्यू झाला. तर काल पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान बाळारामचा देखील मृत्यु झाला.