डोंबिवलीत खळबळ! १७ वर्षीय मुलाने २१ व्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 05:29 PM2021-02-20T17:29:19+5:302021-02-20T17:30:35+5:30

Suicide : गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याने डोंबिवली परिसरात एकच खळबळ माजली होती. 

suicide in Dombivli! A 17-year-old boy committed suicide by jumping from the 21st floor | डोंबिवलीत खळबळ! १७ वर्षीय मुलाने २१ व्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या 

डोंबिवलीत खळबळ! १७ वर्षीय मुलाने २१ व्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या 

googlenewsNext
ठळक मुद्दे याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत मुलाचे नाव सोहम मराठे असं आहे.  

डोंबिवली पश्चिमेकडील यश इन्क्लेव्ह या इमारतीच्या २१ व्या मजल्यावरून उडी मारून एका १७ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत मुलाचे नाव सोहम मराठे असं आहे.  गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याने डोंबिवली परिसरात एकच खळबळ माजली होती. 

 

जुहू चौपाटीवर विकायचा भेळ; सायबर गुन्ह्यातून जमवली कोटींची माया, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 

विष्णूनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, गुरुवारी दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली असून सोहमने आत्महत्या का केली याबाबत अद्याप काहीही कारण समजलेले नाही. आम्ही मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. मुलगा कॉलेजमध्ये शिकत होता. डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखान पाडा येथील खंडोबा मंदिराजवळ असलेल्या यश इन्क्लेव्ह इमारतीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच बुधवारी देखील आजारपणाला कंटाळून डोंबिवलीमधील एकाने कसाराजवळील उंबरमाळी रेल्वेस्थानकाजवळ अंगावर डिझेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली होती. डोंबिवली येथील विष्णूनगर येथील मूलचंद देवजी गौसर (५२)असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Web Title: suicide in Dombivli! A 17-year-old boy committed suicide by jumping from the 21st floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.