विवाहित प्रेयसीने मजा केल्यानंतर लग्नास दिला नकार, लिव इनमध्ये राहणाऱ्या तरूणाने केली आत्महत्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 09:34 AM2021-02-17T09:34:48+5:302021-02-17T09:37:57+5:30
Crime News : मृत तरूण हा सोनीपत गावातील राहणारा होता. तो ५ महिन्यांआधी या महिलेला फेसबुकवर भेटला होता. दोघांमध्ये आधी मैत्री नंतर प्रेम झालं.
पानीपतमध्ये(Panipat) राहणाऱ्या एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या(Suicide) केली आहे. हा तरूण विवाहित प्रेयसीसोबत लिव इनमध्ये राहत होता. पण हळूहळू ती त्याच्यापासून दूर जात होती. याच चिंतेत असलेल्या तरूणाने आत्महत्या केली.
मृत तरूण हा सोनीपत गावातील राहणारा होता. तो ५ महिन्यांआधी या महिलेला फेसबुकवर भेटला होता. दोघांमध्ये आधी मैत्री नंतर प्रेम झालं. इतकंच काय तर दोघे नंतर लिव इनमध्येही राहू लागले होते. असे सांगितले जात आहे की, महिला या तरूणाला लग्नाचं आमिष दाखवत राहिली आणि नंतर तिने लग्नास नकार दिला. हा नकार तो पचवू शकला नाही आणि त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. (हे पण वाचा : खळबळजनक! ब्रेकअपनंतर तरूणीने बॉयफ्रेन्डला घरी बोलवलं, मग होणाऱ्या पतीच्या मदतीने केली त्याची हत्या..)
मृत तरूणाच्या परिवारातील लोक म्हणाले की, या प्रकरणी महिलेला शिक्षा मिळायला हवी. कारण तिच्यामुळे तरूणाचा जीव गेला आहे. पोलिसांनी तरूणाच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा खोलवर तपास केला जाईल.
या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला फोनवर माहिती मिळाली होती की, इंडियन बॅंक बर्स्ट रोड समोरील एका घरात भाडेकरूने फाशी लावून घेतली आहे. पोलीस दरवाजा तोडून आत घुसले आणि तरूणाचा मृतदेह खाली काढला.
तरूणाचा फोन चेक केल्यावर समजले की, तो एका महिलेसोबत चॅटींग करत होता. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीतून समोर आले की, दोघे घरून ५ लाख रूपये घेऊन पळाले होते. जोपर्यंत पैसे होते तोपर्यत सगळं ठिक होतं. जसे पैसे संपले दोघांमध्ये वाद सुरू झाले.
तेच मृत तरूणाच्या कुटुंबियांनी आरोप लावला की, महिला आधीच विवाहित आहे आणि तीन लेकरांची आई आहे. दोघांनी सोबत राहण्यासाठी घरून ५ लाख रूपये पळवले होते. पण नंतर महिलेने तरूणासोबत लग्न करण्यास नकार दिला. या दु:खात त्याने आत्महत्या केली.