सासरच्या छळाला कंटाळून विवाहिेतेची दीड वर्षांच्या मुलासह पेटवून घेत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 05:34 PM2019-11-06T17:34:25+5:302019-11-06T17:35:43+5:30
याप्रकरणी पती, सासू व दोघी नणंद अशा चार जणांवर गुन्हा दाखल...
वडगाव मावळ : सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितीने आपल्या दीड वर्षाच्या मुलासह स्वत: ला पेटून घेऊन आत्महत्या केली. ही घटना मळवंडी ढोरे येथे मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी पती, सासू व दोघी नणंद अशा चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
स्नेहा सोमनाथ ढोरे वय २६ व तिचा दीड वर्षांचा मुलगा स्पर्श सोमनाथ ढोरे असे मृतांचे नाव आहे. या प्रकरणी सोमनाथ रामभाऊ ढोरे ( पती) लक्ष्मीबाई ढोरे ( सासु ), रा. मळवंडी ढोरे पिंकी चांदेकर ( नणंद ), रा. आढले सुनीता सावंत ( नणंद), रा. गोडुंब्रे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून पती व सासू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी लोणावळा विभागाचे विभागीय पोलिस अधिकारी नवनीतकुमार कावत, पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी भेट दिली. या बाबत संतोष सोपान कुंजीर (रा. गहुंजे) यांनी फिर्याद दिली.
वडगाव पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने घरात दररोज भांडणे होत होती.या कारणावरून तिचा छळ होत होता. या छळाला कंटाळून स्नेहा हीने घरात आपल्या दीड वषार्चा मुलगा स्पर्श यासह पेटून घेतले. या मध्ये दोन्ही मायलेकांचा मृत्यू झाला. पुढील तपास वडगाव पोलिस करत आहे.