साताऱ्यातील बालसुधारगृहात अल्पवयीन संशयिताची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 09:50 AM2021-08-28T09:50:15+5:302021-08-28T09:51:47+5:30
Satara Crime News : बालसुधारगृहामध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली. मृताच्या नातेवाईकांनी बालसुधारगृहाबाहेर जमण्यास सुरूवात केल्यानंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.
सातारा - वडूज पोलिसांनी अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात ताब्यात घेतलेला अल्पवयीन संशयित गेली काही दिवस सातारा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आला होता. त्याने आज सकाळी बालसुधारगृहामध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली. मृताच्या नातेवाईकांनी बालसुधारगृहाबाहेर जमण्यास सुरूवात केल्यानंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील एका गावात राहणार्या अल्पवयीन तरूणावर त्याच्याच नात्यातल्या युवतीवर अत्याचार केल्याचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर अल्पवयीन असल्याने त्याला सातारा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान त्याने शनिवारी सकाळी बालसुधारगृहातच आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच संबंधित युवकाच्या नातेवाइकांनी बालसुधारगृहाबाहेर मोठी गर्दी केली होती.