खोलीत झोपण्यासाठी गेले अन् सकाळी...; प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाची आत्महत्या
By राम शिनगारे | Published: September 22, 2022 12:48 PM2022-09-22T12:48:50+5:302022-09-22T12:49:13+5:30
अनिल आग्रहाकर (55) हे कुटुंबासह जवाहर नगर परिसरातील उल्कानगरी भागात वास्तव्यास होते.
औरंगाबाद : शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अनिल माधवराव आग्रहारकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता ही घटना समोर आली. गेल्या दोन दशकांपासून आग्रहाकर बांधकाम क्षेत्रात यशस्वीपणे सक्रिय होते. त्यांच्या आत्महत्येने औरंगाबादच्या क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अनिल आग्रहाकर (55) हे कुटुंबासह जवाहर नगर परिसरातील उल्कानगरी भागात वास्तव्यास होते. औरंगाबादच्या बांधकाम क्षेत्रात त्यांचे नाव अग्रस्थानी होते. शहरात विविध ठिकाणी त्यांचे मोठ्या स्वरूपात गृहप्रकल्प तसेच व्यवसायिक प्रकल्प सुरू आहेत. त्यात प्रामुख्याने उल्कानगगरी, गारखेडा, सूतगुरणी चौकात त्यांचे प्रकल्प सुरू आहेत. गेल्या काही वर्षांत ते यशस्वी बांधकाम व्यवसायिक म्हणून अग्रस्थानी होते. गतवर्षीच क्रेडाई या नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या कोषाध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे ते कुटुंबासोबत संवाद साधून त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी साडेआठ वाजता मात्र ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. कुटुंबाने तत्काळ त्यांना फासावरून उतरून रुग्णालयात दाखल केले. दहा वाजता मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.