लव्ह मॅरेजने निराश तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, ३ महिन्यात संसार मोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 09:37 AM2023-07-18T09:37:49+5:302023-07-18T09:38:18+5:30

अवघ्या तीन महिन्यांत मोडला संसार

Suicide of a young woman disappointed with love marriage | लव्ह मॅरेजने निराश तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, ३ महिन्यात संसार मोडला

लव्ह मॅरेजने निराश तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, ३ महिन्यात संसार मोडला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या प्रेमविवाहानंतर पती, सासूकडून होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने उलवे परिसरातील मोरावे या गावात आपल्या सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी हा प्रकार घडला. या संबंधात तिच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून पती वैभव, सासू संगीता व दीर अमोल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलोनी वैभव म्हात्रे (१९) असे या नवविवाहितेचे नाव असून मे महिन्यात तिचा वैभव म्हात्रे (२०) सोबत प्रेमविवाह झाला होता. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती घरच्यांना मिळाल्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने त्यांचा विवाह लावून देण्यात आला होता. वैभव हा नोकरी, व्यवसाय करत नसल्याने तो पत्नी सलोनी हिला माहेरहून पैसे मागण्यास सांगत होता. शिवाय सासू व दीरदेखील वेगवेगळ्या कारणांनी तिचा छळ करीत होते. त्यामुळे सलोनीचे आई-वडील तिच्या सुखासाठी तिला पैसेदेखील पुरवत होते. 

शनिवारी तिची आई तिच्यासाठी गोड जेवणदेखील घेऊन गेली होती, तर रविवारी दुपारी तिचा भाऊ पैसे देण्यासाठी बहिणीच्या सासरी गेला होता. यावेळी घरात कोणीही आढळून आले नव्हते. काही वेळाने सलोनीला रुग्णालयात दाखल केले असल्याचे त्यांना समजले. यामुळे त्यांनी रुग्णालयात धाव घेतली असता सलोनीचा मृत्यू झाला असून तिने सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. 

पती, सासू व दीरावर गुन्हा
प्रेमविवाह करूनदेखील पतीकडून झालेली निराशा व सासरी होणारा छळ याला कंटाळून तिने आत्महत्या  केल्याचा आरोप तिचे वडील देवीदास मुंढेकर यांनी केला आहे. त्यानुसार, एनआरआय पोलिस ठाण्यात पती वैभव, सासू संगीता व दीर अमोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Suicide of a young woman disappointed with love marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.