मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 06:12 AM2024-11-28T06:12:17+5:302024-11-28T06:12:44+5:30

पंडितने तातडीने तिला नजीकच्या रुग्णालयात नेले. तिथे सृष्टीला मृत घोषित करण्यात आले.

Suicide of Air India female pilot Shrusti Tuli; Incident in Andheri, friend arrested | मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक

मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक

मुंबई - एअर इंडियाची पायलट सृष्टी तुली (२५) हिने अंधेरीच्या मरोळ परिसरात असलेल्या भाडेतत्त्वावरील सदनिकेत सोमवारी आत्महत्या केली. याप्रकरणी तिचा मित्र आदित्य पंडित (२७) याला पवई पोलिसांनी अटक केली आहे. मूळची गोरखपूर असलेल्या सृष्टीची आदित्यशी नवी दिल्लीत ओळख झाली होती. आदित्यला पायलटच्या परीक्षेत अपयश आले होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून तो सतत सृष्टीचा मानसिक छळ करीत होता.

सृष्टी तुली मरोळ येथील रेन फॉरेस्ट इमारतीत भाडेतत्त्वावर राहात होती. रविवारी ती कामावरून घरी परतली. त्यानंतर तिचा आणि आदित्यचा वाद झाला. आदित्य मध्यरात्रीनंतर दिल्लीला रवाना झाला. त्यानंतर सृष्टीने त्याला फोन करत आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. आदित्य पुन्हा सृष्टीच्या सदनिकेकडे परतला. तेव्हा दरवाजा बंद होता. आदित्यने चावी तयार करणाऱ्याकरवी दरवाजा उघडला. तेव्हा त्याला सृष्टीने गळफास घेतल्याचे दिसले. पंडितने तातडीने तिला नजीकच्या रुग्णालयात नेले. तिथे सृष्टीला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर पोलिसांना आणि तुलीच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. पंडितच्या छळामुळे सृष्टी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.

गोरखपूरमधली पहिली महिला पायलट 

तुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०८ नुसार पंडितला अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सृष्टीचे आजोबा नरेंद्रकुमार तुली यांनी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात आपल्या प्राणाची आहुती दिली होती आणि तिच्या काकांनीही भारतीय सैन्यात काही काळ काम केले होते. गोरखपूरमधली पहिली महिला पायलट असलेल्या सृष्टीचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता.

Web Title: Suicide of Air India female pilot Shrusti Tuli; Incident in Andheri, friend arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.