जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपायाची आत्महत्या
By भगवान वानखेडे | Updated: March 25, 2023 16:02 IST2023-03-25T16:01:19+5:302023-03-25T16:02:29+5:30
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपायाची आत्महत्या
बुलढाणा : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात कार्यरत शिपायाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २५ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. विजय सुशीर(४०) असे आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे.
मागील काही वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात कार्यरत असलेले विजय सुशीर यांनी २५ मार्च रोजी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र यावेळी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. पुढील जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकी पोलिस करीत आहेत.