महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; २ दिवस न दिसल्यानं घरचा दरवाजा तोडला, मग...

By नितिन गव्हाळे | Published: August 16, 2023 06:06 PM2023-08-16T18:06:04+5:302023-08-16T18:27:40+5:30

सिटी कोतवाली पोलिस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या, जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सुसाईड नोट आढळले

Suicide of female police constable in akola; After not being seen for 2 days, the door of the house was broken, then... | महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; २ दिवस न दिसल्यानं घरचा दरवाजा तोडला, मग...

महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; २ दिवस न दिसल्यानं घरचा दरवाजा तोडला, मग...

googlenewsNext

अकोला -  जुने शहर पोलिस ठाण्यातर्गंत येणाऱ्या गीता नगरात राहणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणात जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंद केली आहे.आत्महत्या केलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव वृषाली दादाराव स्वर्गे(४५)असे आहे.

ही महिला सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत होती. तिच्या पतीचे निधन झालेले आहे. मुलबाळ नव्हते. वृषाली स्वर्गे हिने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत तिने जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. वृषाली हिने बुधवारी सकाळी राहत्या घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. जुने शहरचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तिच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त करून त्या दिशेनेही तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी ताेडला दरवाजा
मंगळवारपासून वृषालीच्या घराचा दरवाजा बंद होता. वृषाली दोन दिवसांपासून दृष्टीस न पडल्यामुळे अपार्टमेंटमधील काही लोकांनी तिचा दरवाजा वाजविला असता, तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संशय बळावला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परंतु दरवाजा बंद असल्यामुळे आत कसे जावे. असा प्रश्न होता. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा वृषाली मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

Web Title: Suicide of female police constable in akola; After not being seen for 2 days, the door of the house was broken, then...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.