अतिक्रमण काढताना आत्महत्येची धमकी; दोन भावंडांसह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 01:58 PM2021-04-29T13:58:53+5:302021-04-29T13:59:32+5:30

Suicide threats while removing encroachments : दरम्यान यातिघांसह इतर १५ जणांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Suicide threats while removing encroachments; Case filed against 15 persons including two siblings | अतिक्रमण काढताना आत्महत्येची धमकी; दोन भावंडांसह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

अतिक्रमण काढताना आत्महत्येची धमकी; दोन भावंडांसह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी श्याम आनंदचंद भोई (रा.खंडेराव नगर), आकाश शिवाजी गावंडे (रा.रामेश्वर काॅलनी) या दोघांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.

जळगाव : प्रेम नगरात विनापरवानगी भरवण्यात आलेल्या बाजारावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मनपाच्या पथकाला शिवीगाळ करून आत्महत्येची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी घडला. याप्रकरणी श्याम आनंदचंद भोई (रा.खंडेराव नगर), आकाश शिवाजी गावंडे (रा.रामेश्वर काॅलनी) या दोघांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. सागर शिवाजी गावंडे (रा. रामेश्वर काॅलनी) हा फरार आहे.


दरम्यान यातिघांसह इतर १५ जणांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविडमुळे लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचीही कारवाई करण्यात आली आहे. मनपाचे शिपाई भानुदास अंबर ठाकरे (३९, रा. दिनकर नगर) यांनी फिर्याद दिली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

Web Title: Suicide threats while removing encroachments; Case filed against 15 persons including two siblings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.