पोटाचा अल्सर या आजाराने त्रस्त झालेल्या दोन तरुणांच्या आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 03:06 PM2021-08-29T15:06:41+5:302021-08-29T15:07:21+5:30
Suicide Case : नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन हा रोज सकाळी साडे आठ वाजेनंतरच उठायचा.
जळगाव : पोटाचा अल्सर या आजाराने त्रस्त झालेल्या रोहन इंद्रकुमार मेहता (वय २४, सिंधी कॉलनी, जळगाव) व गंगाधर योगराज पाटील (वय ४०, रा. आव्हाणे, ता.जळगाव) या तरुणांनी राहत्या घरांमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडल्या. दोन्ही तरुण अविवाहित आहेत.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन हा रोज सकाळी साडे आठ वाजेनंतरच उठायचा. रविवारी सकाळी तो सात वाजताच उठला. तेव्हा आई सेवा मंडळात पूजेसाठी गेलेली होती तर वडील इंद्रकुमार मुलचंद मेहता हे मॉर्निंग वॉकला गेलेले होते. घरात कोणीच नसल्याचे पाहून रोहन याने गळफास घेतला. मंदिरातून आई जेव्हा घरी आली तेव्हा मुलाने गळफास घेतल्याचे दिसले. कुटुंबाने एकच हंबरडा फोडून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.
तर दुसऱ्या घटनेत गंगाधर हा गेल्या पाच वर्षापासून या आजाराने त्रस्त होता. आई सुमनबाई व वठील योगराज भिका पाटील या दोघांचे निधन झालेले आहे. योगराज हा मोशठा भाऊ महेश यांच्याकडेच राहत होता. तो अविवाहित होता. रविवारी सकाळी त्याने गळफास घेतल्याचे लक्षात येताच तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले