भयंकर! अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या; गावकऱ्यांनी मृतदेहासोबत लावलं प्रेयसीचं लग्न, केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 02:57 PM2021-05-31T14:57:38+5:302021-05-31T15:21:46+5:30
Crime News : संतप्त झालेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहासोबतच प्रेयसीचं लग्न लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना पश्चिम बंगालच्या बर्दवानमध्ये घडली आहे. एकता अल्पवयीन प्रियकराने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहासोबतच प्रेयसीचं लग्न लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि त्याची प्रेयसी यांचे धर्म वेगवेगळे होते. दोघांचेही नातेवाईक त्यांच्या लग्नासाठी तयार होते. मात्र, मुलगा अल्पवयीन असल्याने मुलीची आई या लग्नासाठी तयार नव्हती. याच कारणावरुन मुलगा आणि मुलीमध्ये वाद झाला आणि यातूनच मुलानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्याआधी या मुलाने आपल्या प्रेयसीला आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर त्यानं व्हॉट्सएपवर प्रेयसीला आपला फोटो देखील पाठवला आणि आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
नोटांचे बंडल आणि नोटा मोजण्याची मशीन पाहून अधिकारीही चक्रावले, घटनेने खळबळ#crime#CBI#moneyhttps://t.co/gipP1xvA1b
— Lokmat (@MiLOKMAT) May 29, 2021
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर या मुलाचा मृतदेह गावात आणण्यात आला आणि पुन्हा एकदा वाद सुरू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी याप्रकरणी मुलगी आणि तिच्या आईला जबाबदार धरत दोघींना बेदम मारहाण केली. यानंतर दोघींलाही जबरदस्ती मुलाच्या मृतदेहाजवळ आणण्यात आलं. यानंतर मुलाच्या मृतदेहाकडून मुलीच्या भांगेत कुंकू भरण्यात आलं. शहरातील कांटापुकूर परिसरात हा मुलगा राहत होता. मृताच्या शेजाऱ्यांनी या मुलीला याची कल्पना होती, की मुलगा आत्महत्या करत आहे असं म्हटलं आहे.
बापरे! शेतात साप पकडला, त्याला मारलं आणि तसंच खाल्लं...; Video जोरदार व्हायरल#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/0740R2V9qI
— Lokmat (@MiLOKMAT) May 28, 2021
मुलीकडे त्याच्या आईचा फोन नंबरही होता. मात्र, तरीही तिने याबाबत मुलाच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली नाही. वेळेवर मुलाच्या घरच्यांना याबाबत माहिती दिल्यास त्याला वाचवता आलं असतं, असं त्यांनी म्हटलं आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाण आणि अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याची तक्रार मुलीच्या आईनंही पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. आरोपींविरोधात कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : धक्कादायक! पतीपाठोपाठ झालं मुलाचंही निधन...मन सुन्न करणारी घटना #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/JJbwfl5bKF
— Lokmat (@MiLOKMAT) May 29, 2021