बर्थडे केक कापताना पतीसोबत झालं भांडण, सकाळी फॅनला लटकलेला दिसला पत्नीचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 16:33 IST2022-02-19T16:32:28+5:302022-02-19T16:33:45+5:30
ही घटना नोएडाच्या सेक्टर ११९ मध्ये एलल्डिको आमंत्रण सोसायटीतील आहे. येथील सोमन सिंह नावाची महिला पती उत्तम कुमारसोबत राहत होती.

बर्थडे केक कापताना पतीसोबत झालं भांडण, सकाळी फॅनला लटकलेला दिसला पत्नीचा मृतदेह
नोएडा (Noida) सेक्टर ११९ मधून आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे वाढदिवसाचा आनंद काही क्षणात दु:खात बदलला. असं सांगितलं जात आहे की, वाढदिवसाचा कापताना पती आणि पत्नीमध्ये भांडण झालं आणि महिलेने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. सूचना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवला.
ही घटना नोएडाच्या सेक्टर ११९ मध्ये एलल्डिको आमंत्रण सोसायटीतील आहे. येथील सोमन सिंह नावाची महिला पती उत्तम कुमारसोबत राहत होती. मृत महिलेचा पती एका मोठ्या कंपनीत इंजिनिअर आहे आणि दोघांना एक १० वर्षांचा मुलगा आहे. शुक्रवारी सोनमचा वाढदिवस होता आणि रात्री १२ वाजता केक कापण्याचा प्लान होता. केक कापताना पत्नीचं उत्तमसोबत काही कारणावरून वाद झाला.
थोड्या वेळाने वाद जरा शांत झाला आणि सोनम रूममध्ये झोपायला गेला. सकाळी ती रूममधून बाहेर आली नाही आणि पतीने आवाज दिला. पण तरीही काही रिस्पॉन्स मिळाला नाही. दरवाजा उघडून पाहिला तर ती फॅनला लटकलेली दिसली. नंतर लगेच पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलीस पुढील तपास करत आहे.