मी जॅकलिनला सोडावं अशी नोराची इच्छा होती, पण...; सुकेश चंद्रशेखरचा नवा 'लेटर' बॉम्ब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 05:29 PM2023-01-21T17:29:48+5:302023-01-21T17:30:08+5:30
सुकेश चंदशेखर याने अभिनेत्री नोरा फतेहीने जॅकलिनवर लावलेले आरोप बनावट असल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली - २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने आणखी एक खळबळजनक दावा करणारं पत्र लिहिलं आहे. सुकेशने हे पत्र नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील वादावर लिहिलं आहे. नोरा फतेहीनं तिचा जबाब आर्थिक गुन्हे ब्युरो (EOW)समोर बदलला होता. नोराला मी जॅकलीनला सोडावे असं वाटत होतं. माझ्या नकारानंतरही नोरा मला त्रास देत आहे असा दावा सुकेशने केला आहे.
सुकेशने पत्रात पुढे लिहिलंय की जॅकलिन आणि मी गंभीर नात्यात होतो. यामुळेच नोराला जॅकलिनचा हेवा वाटू लागला होता. जॅकलीनबाबत मला भडकवायची आणि माझं ब्रेनवॉश करत होती. नोराची इच्छा होती की मी जॅकलीनला सोडावं. निक्की तांबोळी आणि चाहत खन्ना हे फक्त व्यावसायिक सहकारी होते आणि ते माझ्या प्रॉडक्शनमध्ये काम करणार होते. मी जॅकलीनला सोडून तिला डेट करायला लागावे असी नोराची इच्छा होती. नोराने मला दिवसातून किमान १० वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला आणि जर मी तिच्या कॉलला उत्तर दिले नाही तर ती कॉल करत राहण्यासाठी माझ्यावर दबाव आणत असे असं त्याने सांगितले.
सुकेश चंदशेखर याने अभिनेत्री नोरा फतेहीने जॅकलिनवर लावलेले आरोप बनावट असल्याचं म्हटलं आहे. नोरावर आरोप करताना सुकेश म्हणाला की, नोराने ईडीसमोर आणि EWOसमोर वेगवेगळी विधाने केली, यावरून ती तिच्या मनातून एक कथा रचत असल्याचं सिद्ध होतं. तिला माझ्याकडून कार घ्यायची नाही असं तिने सांगितले ते सर्वात मोठे खोटे आहे. नोरा मला भेटली तेव्हा तिच्याकडे महागडी कार नव्हती. पण तिने आणि मी मिळून एक आलिशान कार निवडली ज्याचे स्क्रीन शॉट्स ED कडे आहेत. त्यामुळे नोराने खोटे बोलू नये असं सुकेशनं बजावलं.
खरं म्हणजे मला तिला रेंज रोव्हर द्यायची होती. पण ती स्टॉकमध्ये नव्हती. म्हणून मी त्याला एक एस सीरीज BMW कार भेट दिली जी तिने बराच काळ स्वत:कडे ठेवली होती. नोरा मला महागड्या बॅग आणि दागिन्यांचे फोटो पाठवत असे. ज्या मी तिला भेटवस्तू दिल्या आहेत. ती अजूनही त्यांचा वापर करत आहे. मी नोराला सुमारे २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या, त्यामुळे ती ते खरेदी केल्याचे बिल कधीही दाखवू शकत नाही. निक्की तांबोळी आणि चाहता खन्ना यांच्याशी माझे फक्त व्यावसायिक संबंध होते आणि दोघेही माझ्या निर्मितीमध्ये काम करणार होते.