नोरा फतेहीला पटवण्यासाठी सुकेश चंद्रशेखरने काय काय दिल्या होत्या तिला ऑफर? वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 12:49 PM2023-01-19T12:49:49+5:302023-01-19T12:51:12+5:30
Sukesh Chandrashekhar Case : सुकेश चंद्रशेखर तिला गर्लफ्रेंड बनवण्यासाठी लक्झरी गाडीपासून ते ऐशोआरामाच्या जीवनाची ऑफर दिली होती. तिने दावा केला की, सुकेशने त्याची सहकारी पिंकी ईराणीच्या माध्यमातून ही ऑफर दिली होती.
तुरूंगात कैद सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) शी निगडीत 200 कोटी रूपयांच्या खंडणी केसमध्ये एक मोठा खुलाला झाला आहे. सुकेश चंद्रशेखर विरोधातील 200 कोटी रूपयांच्या वसूली केसमध्ये साक्षीदार बनलेली अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ने काही दिवसांआधी तिचा जबाब कोर्टात नोंदवला होता. ज्यात तिने दावा केला होता की, सुकेश चंद्रशेखर तिला गर्लफ्रेंड बनवण्यासाठी लक्झरी गाडीपासून ते ऐशोआरामाच्या जीवनाची ऑफर दिली होती. तिने दावा केला की, सुकेशने त्याची सहकारी पिंकी ईराणीच्या माध्यमातून ही ऑफर दिली होती.
इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, 13 जानेवारीला कोर्टात जबाब देताना नोराने दावा केला की, सुकेश चंद्रशेखर म्हणाला होता की, जर मी त्याची गर्लफ्रेंड बनले तर तो मला एक मोठं घर, कार आणि लक्झुरिअस लाइफस्टाईल देणार. ती म्हणाली की, पिंकी ईराणीने तिच्या चुलत भावाला संपर्क केला होता आणि म्हणाली होती की, सुकेशची ऑफर स्वीकारण्यासाठी जॅकलीन फर्नांडीस लाइनमध्ये आहे. पण सुकेशला तू जास्त आवडते. इतकंच नाही तर ईराणी असंही म्हणाली होती की, सुकेशसाठी अनेक हिरोईन आतुर आहेत.
नोराने कोर्टात सांगितलं की, तिला सुकेशची पत्नी अभिनेत्री लीना मारियाने चेन्नईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बोलवलं होतं. तिला कार्यक्रमात चीफ गेस्ट बनने, एका डान्स कॉम्पिटिशनसाठी जज बनने आणि दिव्यांग मुलांना पैशांचं एक पाकिट देण्यासाठी सांगण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर सुकेशने थॅंक्यू टोकन म्हणून एक कार मला ऑफर केली होती. नोरा म्हणाली की, मी कार नाकारली होती. कारण त्याने आधीच एक आयफोन आणि गुस्सीची बॅग गिफ्ट दिली होती. पण आरोपी सुकेश कार घेण्यासाठी मागे लागला होता.
त्यानंतर नोराने सांगितलं की, कारसाठी पुन्हा पुन्हा जोर दिल्यावर तिने तिचा नातेवाईक बॉबीसोबत सुकेशचा परिचय करून दिला होता. आरोपी सुकेश आणि बॉबीने एका सिनेमाची डील केली. ज्यात सिनेमा साइन करण्याच्या बदल्यात सुकेश नोराला एक बीएमडब्ल्यू कार गिफ्ट देणार होता. अशाप्रकारे नोराला सुकेशने बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली. पण ही कार तिचा नातेवाईक बॉबीकडेच होती. कारण त्यावेळी नोरा दुबईला गेली होती.
जेव्हा ती दुबईमध्ये होती तेव्हा तिला बॉबीचा फोन आला की, सुकेशच्या ऑफरबाबत टीव्ही अॅंकर ईराणीने त्याला संपर्क केला आणि म्हणाली की, जर नोरा फतेही सुकेशची गर्लफ्रेंड बनली तर तिच्या जगण्याचा आणि करिअरचा सगळा खर्च तो उचलेल. सुकेशने ऑफर पाठवली होती की, जर नोरा त्याची गर्लफ्रेंड बनली तर तो तिला सगळ्या सुख-सुविधा देणार.
दरम्यान दिल्ली पोलिसांनी याच सोमवारी कोर्टाला सांगितलं होतं की, कथित ठग सुकेश चंद्रशेखरची सहकारी पिंकी ईराणीने चंद्रशेखरची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीससोबत भेट करून दिली आणि ईराणीनेच 200 कोटी रूपयांच्या वसूलीत महत्वाची भूमिका बजावली. आता जॅकलीन आणि नोरा दोघीही या केसमध्ये साक्षीदार झाल्या आहेत.