एसीपी दीपक फटांगरेंना समन्स; रेश्मा खान प्रकरणी सीआययू नोंदविणार जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 09:31 AM2022-03-09T09:31:59+5:302022-03-09T09:32:02+5:30
खानला न्यायालयात अटकेतून अंतरिम दिलासा मिळाला असताना, न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेने तिचा डीएनए अहवाल पाठवला, ज्यात ती खैराती हसन आणि आस्मा खातून यांची मुलगी असल्याची पुष्टी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बांग्लादेशी महिला रेश्मा खान हिला बनावट पासपोर्टप्रकरणी मदत केल्याच्या आरोपाखाली निवृत्त सहायक पोलीस आयुक्त दीपक फटांगरे यांना गुन्हे शाखेच्या (सीआययू) कडून समन्स पाठविले जाण्याची माहिती आहे. खान ही भाजप पदाधिकारी तसेच मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थर विकास महामंडळाचे उपाध्यक्ष हैदर आझम यांची दुसरी पत्नी आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीआययू हे फटांगरे यांचा जबाब नोंदविण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार त्यांना यासाठी समन्स पाठविले जाणार आहे. मालवणी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना खान हिच्या विरोधात दखलपात्र एफआयआर न नोंदवल्याबद्दल फटांगरे आणि आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्यावर मालवणी पोलीस ठाण्यात सीआययूने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तत्कालीन सीआययूचे प्रमुख दीपक कुरूलकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनीच २०१५ मध्ये या सर्व प्रकरणाची चौकशी केली होती.
खानला न्यायालयात अटकेतून अंतरिम दिलासा मिळाला असताना, न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेने तिचा डीएनए अहवाल पाठवला, ज्यात ती खैराती हसन आणि आस्मा खातून यांची मुलगी असल्याची पुष्टी केली. जे बांग्लादेशी नागरिक असल्याचा आरोप फेटाळून लावण्यात आला.