जावयाचा ‘ दैत्य पराक्रम ’ : सासू-सासऱ्यांना कारने उडवून दांडक्याने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 09:02 PM2019-03-30T21:02:11+5:302019-03-30T21:07:40+5:30
आपल्या मुलीचा सासरी वारंवार छळ करत मारहाण करणाऱ्या जावयाविरोधात पोलिसांत तक्रार देण्यासाठी सासू-सासरे निघाले होते.
उरुळी कांचन : आपल्या मुलीचा सासरी वारंवार छळ करीत मारहाण करणाऱ्या जावयाविरोधात पोलिसांत तक्रार देण्यासाठी निघालेल्या सासू-सासऱ्यांच्या दुचाकीला आपल्या चारचाकी वाहनाने धडक देत नंतर सासू-सासऱ्यांना लाकडी दांडक्याने जावयाने बेदम मारहाण केल्याची घटना उरुळी कांचन गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि. २९) घडली. मारहाण करताना शेजारील नागरिक संतप्त होऊन अंगावर धावल्याने आपली सुटका करून घेण्याचा नादात या जावयाने पुन्हा एका दुचाकीस्वाराला आपल्या चार चाकीने उडवून गंभीर जखमी केले आहे.
या प्रकरणी शिवाजी आनंता म्हस्के (वय ५५, रा. डाळिंब , ता. दौंड) यांंनी आपल्या जावयाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या हल्लात सविता शिवाजी म्हस्के (वय ५०, रा. डाळिंब, ता. दौंड) या गंभीर जखमी झाल्या आहेत. तर, कारने धडक देऊन सोमनाथ दादा तुपसौंदर (वय ४०, रा. खुडावस्ती, डाळिंब, ता. दौंड) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी आमोल परशुराम महाडिक (वय ३६, रा. काळेशिवारवस्ती, शिंदवणे, ता. हवेली) या जावयाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिवाजी म्हस्के यांची मुलगी उज्ज्वला यांचा विवाह अमोल महाडिक यांच्याशी झाला आहे. अमोल हा आपल्या पत्नीला वारंवार मारहाण करीत तिचा छळ करीत होता. यामुळे शुक्रवारी (दि. २९) सासरे शिवाजी म्हस्के व सासू सविता हे उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्रात तक्रार देण्यासाठी सकाळी साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून उरुळी कांचनच्या दिशेला निघाले. सासू-सासरे तक्रार करणार असल्याची कुणकुण लागताच जावई अमोल महाडिक हा त्याच्या मोटारकारने उरुळी कांचन-डाळिंब रस्तावर येऊन सासू-सासºयांचा दुचाकीला कारने जोरदार धडक देऊन दोघांना रस्त्यावर पाडले. त्यानंतर गाडीतून काढलेल्या लाकडी दांडक्याने सासू-सारसºयांना मारहाण केली. रस्त्यावर हा मारहाणीचा प्रकार झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपी अमोल महाडिक याचा अंगावर धाव घेतल्याने कार चालू करून पळण्याचा प्रयत्नात रस्त्यावर समोरून येणारे सोमनाथ दादा तुपसौंंदर यांना १०० फूट अंतरावर कारने उडवून महाडिक पळाला. या धडकेत तुपसौंंदर हे जखमी झाले आहेत. नागरिकांनी तत्काळ जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आरोपी अमोल महाडिक हा मारहाण करून फरार झाला असून पोलिसांनी आरोपीवर मारहाणीस व अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल