अखेर कल्याण आधारवाडी कारागृहाचे अधीक्षक निलंबीत

By मुरलीधर भवार | Published: July 12, 2023 05:59 PM2023-07-12T17:59:32+5:302023-07-12T18:00:04+5:30

कारागृहात सापडे हाेते १५ मोबाईल

Superintendent of Kalyan Aadharwadi Jail suspended in kalyan | अखेर कल्याण आधारवाडी कारागृहाचे अधीक्षक निलंबीत

अखेर कल्याण आधारवाडी कारागृहाचे अधीक्षक निलंबीत

googlenewsNext

मुरलीधर भवार

कल्याण-आधारवाडी कारागृहातील कच्च्या कैद्यांकडे १५ मोबाईल सापल्या प्रकरणी कारागृहाचे अधीक्षक अंकुश सदाफुले यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्य तुरुंग प्रशासनाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

आधारवाडी कारागृहात ५०० कैद्यांची व्यवस्था होईल इतकीच सोय आहे. त्याठीकाणी आजच्या घडीला १ हजार पेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आले आहे. कारागृहावर ताण आल्याने काही कैदी हे तळोजा कारागृहात पाठविले जातात. कारागृहात अनेक कैद्यामध्ये हाणामाऱ््या होत असतात. काही कैद्यानी कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही कैदी जेवण योग्य प्रकारे मिळत नसल्याने कारागृहात उपोषण करतात. या सगळ्या आतल्या गोष्टी बाहेर येत नसल्या तरी काही प्रकरणात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होत असतात. राज्य तुरुंग प्रशासनाच्या वतीने मे महिन्यात सर्च आ’परेशन घेण्यात होते. या सर्च आ’परेशनमध्ये कारागृहातील कैद्यांकडे १५ मोबाईल मिळून आले होते. १५ मोबाईल सापल्यावर या प्रकरणी आधारवाडी कारागृह अधीक्षक सदाफुले यांनी ठोस कारवाई करणे अपेक्षीत होते. त्यांच्याकडून पाहिजे कारवाई केली गेली नसल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. १५ मोबाईल सापल्या प्रकरणी आत्ता खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तुरुंग प्रशासनाकडून कारागृह अधीक्षक सदाफुले यांना निलंबीत करण्यात आले आहे. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे. कारागृहातील कैदी त्यांच्या बाहेरच्या लोकांशी संपर्क साधण्याकरीता मोबाईल वापरतात. कारागृहात मोबाईल वापरास बंदी असताना १५ मोबाईल कैद्याच्या हाती गेलेच कसे असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित केला जात आहे. कारागृहातील भ्रष्ट कारभारामुळे मोबाईल कारागृहात पोहचविले गेले. कारागृहात कैद्यांना अन्य सुख सुविधा पुरविल्या जातात हेच या घटनेवरुन उघड झाले आहे. या घटनेमुळे कारागृहाचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

दरम्यान या संदर्भात अधीक्षक सदाफुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी ३१ वर्षे सेवा केली. या ३१ वर्षात २१ प्रशस्ती पत्रके आणि पाच रोख रक्केची पारितोषिके मिळाली आहेत. कारागृहामध्ये एकही मोबाईलही सापडला नाही. मला दाखावावेत कुठे मोबाईल सापडले. मला सेवेत बढती मिळणार आहे म्हणून माझ्या विरोधात जाणीवपूर्व कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Superintendent of Kalyan Aadharwadi Jail suspended in kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.