पोलीस अधिक्षकांची तडकाफडकी कारवाई; पोलीस निरीक्षकासह चौघे निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 06:17 PM2021-05-22T18:17:08+5:302021-05-22T18:18:29+5:30
Custodial Death Case : या मृत्यूला आमगाव पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी व दोन कर्मचारी यांना कारणीभूत ठरवून पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी चार जणांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
गोंदिया: चोरीच्या प्रकरणात राजकुमार अभयकुमार धोती (३०, रा.कुंभारटोली) याला अटक करण्यात आली होती. परंतु पोलीस कस्टडीत असतांना २२ मे च्या पहाटे ५.१५ वाजता राजकुमार याचा मृत्यू झाला. या मृत्यूला आमगाव पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी व दोन कर्मचारी यांना कारणीभूत ठरवून पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी चार जणांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये आमगावचे ठाणेदार सुभाष चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, ठाणेदाराचा वाहन चालक पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे बक्कल नंबर १०१४, पोलीस शिपाई अरूण उईके बक्कल नंबर १८७७ यांचा समावेश आहे. या चौघांना गोंदियाच्या पोलीस मुख्यालयात सलग्न करण्यात आले आहे.
आमगाव पोलिसांनीपोलिसांची प्रतिमा मलीन करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य केले. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम २५ व महाराष्ट्र पोलीस शिक्षा व अपील अधिनयम १९५६ मधील नियम ३ च्या पोटनियम (१-अ) (एक) (ब) अन्वये पोलीस अधिक्षकांनी त्या चौघांना निलंबित करण्यात आले आहे.