बुटांच्या सोलमधून राजस्थानमधून मुंबईत ड्रग्जचा पुरवठा, पाच कोटी किंमतीचे हेरॉइन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 07:34 PM2022-02-06T19:34:53+5:302022-02-06T19:42:11+5:30

Drugs Seized by ATS :याप्रकरणी एटीएसने उत्तराखंडमधील दुकलीला अटक केली आहे. तर, राजस्थानमधील पसार आरोपीचा शोध घेत आहे.

Supply of drugs from Rajasthan to Mumbai from shoe sole, heroin worth Rs 5 crore seized | बुटांच्या सोलमधून राजस्थानमधून मुंबईत ड्रग्जचा पुरवठा, पाच कोटी किंमतीचे हेरॉइन जप्त

बुटांच्या सोलमधून राजस्थानमधून मुंबईत ड्रग्जचा पुरवठा, पाच कोटी किंमतीचे हेरॉइन जप्त

Next

मुंबई : नवीन बुटांच्या सोलमधून राजस्थान मधून मुंबईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीचा राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पर्दाफाश केला आहे. यामध्ये पालघर मधून सव्वा पाच कोटी किंमतीचा १ हजार ७२४ ग्रँम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी एटीएसने उत्तराखंडमधील दुकलीला अटक केली आहे. तर, राजस्थानमधील पसार आरोपीचा शोध घेत आहे.

एटीएसच्या जुहू आणि ठाणे युनिटने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. पालघरच्या उत्तर रात्री पेल्हारे गावातून ४ फेब्रुवाऱी रोजी सव्वा पाच कोटी किंमतीचा १ हजार ७२४ ग्रँम हेरॉईन जप्त केले. तसेच अडीच लाख रूपयांच्या रोकड़सह दोन मोबाईल फोन जप्त केले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवत, एटीएसने मोहम्मद अख्तर (४६), छोटा मोहम्मद नासीर (४०) या दोघांना अटक केली आहे. दोघेही उत्तराखंड राज्यातील हरिद्वार जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघांना १५ फेब्रुवाऱी पर्यंत पोलीस कोठड़ी सुनावली आहे. 

स्वयंपाकास उशीर झाल्याने पतीने केले क्रूर कृत्य, पत्नीला डिझेल ओतून पेटवले

अर्धनग्न अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह, बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय, एका आरोपीला अटक

पेल्हारे गावात ते भाड़े तत्त्वावर राहून ड्रग्जचा धंदा करत असल्याचे समोर आले. राजस्थानमधील आरोपीने हा माल त्यांच्यापर्यंत पुरवला होता. नवीन बुटांची जोड़ी घेवून बुटाचे सोल आतून कापायचे, त्यामध्ये निर्माण झालेल्या जागेत ड्रग्ज ठेवून हस्तकामार्फ़त हे ड्रग्ज मुंबईत पाठवत होता. पुढे, ही दुकली हेच ड्रग्ज किरकोळ विक्रेत्यांना पुरवत होते. त्यानुसार, दोघांकड़े कसून चौकशी सुरु आहे. तसेच, राजस्थानमधील आरोपीचा शोध सुरु असल्याचे एटीएसने सांगितले आहे. 

Web Title: Supply of drugs from Rajasthan to Mumbai from shoe sole, heroin worth Rs 5 crore seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.