हेमंत नगराळे यांना दिला दणका; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 09:19 PM2021-12-19T21:19:35+5:302021-12-19T21:48:43+5:30
Supreme Court refuses Hemant Nagrale's Petition : हेमंत नगराळे यांनी मागील चार महिन्यांची पोटगीची रक्कम थकवली असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. हेमंत नगराळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने न्यायालयात तक्रार दाखल केली होती. चार महिन्याची पोटगीची रक्कम नगराळे यांनी थकवली असल्याची याचिका पत्नीने न्यायालयात दाखल केली होती. त्यामुळे पत्नीचा न्यायालयातला अर्ज रद्द करण्याची मागणी हेमंत नगराळे यांनी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हेमंत नगराळे यांची मागणी करणारी फेटाळली असल्यामुळे नगराळे यांना न्यायालयीन दिलासा मिळाला नाही.
२०११ साली हेमंत नगराळे यांचा घटस्फोट झाला होता. त्यावेळी कुटुंब न्यायालयाने त्यांना दरमहा २० हजार पोटगी मंजूर केली आहे. तसेच या पोटगीमध्ये वाढ करण्याची मागणीही त्यांच्या पत्नीने केली. हेमंत नगराळे यांच्या पहिल्या पत्नी मुंबई उच्च न्यायालयात देखभाली खर्च वाढून देण्यात यासाठी याचिका केली होती. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. हेमंत नगराळे यांच्या पत्नीच्या याचिकेनुसार प्रति महिना दीड लाख रुपये करण्यात यावा. तसेच, महाराष्ट्रातील पुणे किंवा नागपूर या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
शाळकरी मुलाचा संशयास्पद मृत्यू; तरुणांनी मारहाण केल्याचा आरोप
३ हजाराची लाच घेणाऱ्या उल्हासनगर महापालिकेचा अधिकाऱ्याचं अखेर निलंबित
हेमंत नगराळे यांनी मागील चार महिन्यांची पोटगीची रक्कम थकवली असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. तसेच नगराळे यांच्याकडून असे पहिल्यांदा होत नसल्याचेही त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत सांगितले आहे. त्यामुळे पत्नीचा न्यायालयातला अर्ज रद्द करण्याची मागणी नगराळे यांनी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नगराळे यांची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे मंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना न्यायालयाने दणका दिला आहे.