सुप्रीम कोर्टाच्या महिला वकिलाची पतीने केली हत्या, २४ तास स्टोअर रूममध्ये लपला अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 01:15 PM2023-09-11T13:15:20+5:302023-09-11T13:16:26+5:30

बंगल्याच्या आतमधला 'तो' भयानक दिवस, वाचा सारं काही सविस्तर

supreme court woman advocate renu sinha murder case husband arrested in store room Noida Delhi | सुप्रीम कोर्टाच्या महिला वकिलाची पतीने केली हत्या, २४ तास स्टोअर रूममध्ये लपला अन् मग...

सुप्रीम कोर्टाच्या महिला वकिलाची पतीने केली हत्या, २४ तास स्टोअर रूममध्ये लपला अन् मग...

googlenewsNext

Supreme court advocate murder, Husband Wife : सर्वोच्च न्यायालयाच्या महिला वकिलांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अखेर आरोपी पतीला शोधून काढले. पतीची हत्या केल्यानंतर पती घरातील स्टोअर रूममध्येच लपून बसला होता. रात्री 3 वाजता पोलिसांनी त्याला स्टोअर रूममधून बाहेर काढले. हत्येनंतर आरोपी स्टोअर रूममध्ये लपला आणि २४ तास तिथेच राहिला असे सांगितले जात आहे. सध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. (renu sinha murder case)

कुठे, कसा घडला प्रकार?

गेल्या रविवारी नोएडा सेक्टर 30 येथील डी-40 कोठीमध्ये राहणाऱ्या रेणू सिन्हा यांचा रक्ताने माखलेला मृतदेह घराच्या बाथरूममध्ये सापडला होता. ६१ वर्षीय रेणू सिन्हा या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होत्या. रेणू यांचा खून झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. पोलिस जेव्हा बाथरूममध्ये पोहोचले तेव्हा तेथील दृश्य भयावह होते. कारण, रेणू यांचा मृतदेह रक्ताने माखलेला होता आणि सगळीकडे रक्त पसरले होते. हा प्रकार पाहताच घरात एकच गोंधळ माजला. पोलिसांनाही हा प्रकार पाहून खूप विचित्र वाटले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.

रेणू यांच्या पतीने हा हल्ला केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. हत्येनंतर रेणू यांचा पती फरार होता. पोलीस त्याचा शोध घेण्यात व्यस्त होते. त्याचा कुठेही पत्ता लागत नव्हता. अशा स्थितीत रेणू यांच्या पतीवरील संशय बळावत होता. यादरम्यान, काल रात्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

आरोपी पती स्टोअर रूममध्ये बसला होता लपून

खून झाल्यापासून आरोपी पती घराच्या स्टोअर रूममध्येच लपून बसला होता. रात्री 3 वाजता पोलिसांनी त्याला बाहेर काढले. गेल्या २४ तासांपासून तो स्टोअर रूममध्ये लपून बसल्याचे सांगण्यात आले. आता पोलीस त्याची चौकशी करत आहेत. काल घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी रेणूचा अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. तिच्या मृत्यूसाठी कुटुंबीयांनी रेणूच्या पतीला जबाबदार धरले आहे. पोलिस पथकाने लोकांचे जबाब घेतले असून घटनास्थळावरून पुरावेही गोळा केले आहेत. शिवाय गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये घराबाबत वाद होता, यातूनच त्याने ही हत्या केली. या दोघांमध्ये बराच काळ मतभेद होते. रेणू फोन उचलत नसल्याची माहिती या महिलेच्या भावाने रविवारी पोलिसांना दिली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरवाजा तोडल्यानंतर पथकाने आत जाऊन तपासणी केली असता घराच्या बाथरूममध्ये रेणूचा मृतदेह पडलेला आढळून आला. रेणूच्या कानाजवळ जखमेच्या खुणा होत्या. त्यानंतर पोलिसांनी रेणू यांच्या पतीला फोन केला पण त्याचा फोन बंद होता.

Web Title: supreme court woman advocate renu sinha murder case husband arrested in store room Noida Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.