फरसाणच्या पाकिटात ६.४५ कोटींचे हिरे घेऊन जाणाऱ्याला असं पकडलं, सूरत विमानतळावर थरारनाट्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 10:42 PM2022-07-30T22:42:01+5:302022-07-30T22:43:27+5:30

गुजरातच्या सूरत विमानतळावर तैनात कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूरतहून दुबईला पळून जाणाऱ्या एका तरुणाच्या सुटकेसमधून हिरे जप्त केले आहेत.

surat youth arrested airport diamonds worth 6 45 crores which carrying namkeen packets | फरसाणच्या पाकिटात ६.४५ कोटींचे हिरे घेऊन जाणाऱ्याला असं पकडलं, सूरत विमानतळावर थरारनाट्य!

फरसाणच्या पाकिटात ६.४५ कोटींचे हिरे घेऊन जाणाऱ्याला असं पकडलं, सूरत विमानतळावर थरारनाट्य!

Next

सूरत-

गुजरातच्यासूरत विमानतळावर तैनात कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूरतहून दुबईला पळून जाणाऱ्या एका तरुणाच्या सुटकेसमधून हिरे जप्त केले आहेत. या हिऱ्यांची किंमत जवळपास ६ कोटी ४५ लाख रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या हिऱ्यांच्या कागदपत्रांची विचारणा केली असता ती सादर न करु शकल्यामुळे संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार सूरत विमानतळावर तैनात कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्तचर विभागाकडून टिप मिळाली होती. गुरुवारी संध्याकाळी सूरत विमानतळावरुन जावेद पठाण नावाचा व्यक्ती कोट्यवधी किमतीचे हिरो घेऊन शारजहाला जाणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानंतर कस्टम विभागाचे अधिकारी विमानतळावर अलर्टमोडवर होते. जावेद पठाण सूरत विमानतळावर पोहोचताच अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी सुरू केली आणि जावेदची सूटकेस तपासली. 

जावेदच्या सूटकेसच्या वरच्या भागात कपडे होते. तर खालच्या भागात फरसाणाचं पाकिट होतं. या पाकिटात छोट्या-छोट्या पाकिटात हिरे लपवले होते. संशय येऊ नये म्हणून फरसाणाचं पाकिट हुबेहुब कंपनी पॅकेजिंगसारखं बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे सुरुवातीला अधिकाऱ्यांनाही बंद पाकिटात हिरे असतील याचा अंदाज आला नाही. पण अधिकाऱ्यांनी जेव्हा फरसाणाच पाकिट उघडून पाहिलं तेव्हा त्यात कार्बन कोटेड कागदानं बनवलेली छोटी पाकिटं दिसून आली. यात २६६३ कॅरेटचे हिरे आढळून आले. या हिऱ्यांची किंमत ६ कोटी ४५ लाख रुपये इतकी असल्याचं अंदाज आहे. 

स्कॅनर मशीनमध्ये दिसले जाऊ नयेत यासाठीच जावेद पठाण यानं कार्बन कोटेड कागदानं बनवलेल्या पाकिटात हिरे ठेवले होते. जावेद पठाण सूरतच्या उधना येथील रहिवासी आहे. तो पहिल्यांदाच सूरतहून शारजहाला जाणार होता. त्यानं जानेवारीतच पासपोर्ट बनवला होता. परदेशात जाऊन हे हिरे जावेद पठाण दुसऱ्या व्यक्तीला देणार होता असा संशय अधिकाऱ्यांना आहे. जावेद पठाणची चौकशी सुरू आहे. 

Web Title: surat youth arrested airport diamonds worth 6 45 crores which carrying namkeen packets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.