५० लाखांच्या खंडणीप्रकरणी सुरेश पुजारीचा हस्तक गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 02:13 PM2018-12-08T14:13:56+5:302018-12-08T14:14:43+5:30
शर्माला न्यायालयात हजर केले असता 13 डिसेंबरपर्यंत त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही करवाई खंडणी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने केली.
Next
ठाणे - उल्हासनगर परिसरातून कुख्यात गुंड सुरेश पुजारीचा हस्तक मिरचु वशालराम शर्मा ( वय ५१) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली. खंडणी उकळण्यासाठी उल्हासनगर येथील व्यापाऱ्यांची माहिती तो पुजारीला देत होता. त्यानुसार पुजारी फोनवर धमकी देत खंडणीची मागणी करत. अशाप्रकारे 50 लाखांची मागणी केल्याप्रकरणी खड़कपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी शर्मा याला काल अटक केली. शर्माला न्यायालयात हजर केले असता 13 डिसेंबरपर्यंत त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही करवाई खंडणी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने केली.