SurJyotsna Awards 2021: पूजा चव्हाण प्रकरण हे सरकार सीबीआयकडे काय देणार; देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल

By पूनम अपराज | Published: February 16, 2021 07:18 PM2021-02-16T19:18:15+5:302021-02-16T19:19:39+5:30

Devendra Fadnavis talks on Pooja Chavan Suicide Case : पूजा प्रकरण सीबीआयकडे सरकारनं द्यायला हवं का याबाबत विचारलं असता फडणवीसांनी जोरदार टीका केली. हे सरकार पोलिसांवरच इतका दबाव आणून प्रकरण दाबतंय. 

SurJyotsna Awards 2021: Pooja Chavan case: What will this government give to CBI; Such is the thorny question of Devendra Fadnavis | SurJyotsna Awards 2021: पूजा चव्हाण प्रकरण हे सरकार सीबीआयकडे काय देणार; देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल

SurJyotsna Awards 2021: पूजा चव्हाण प्रकरण हे सरकार सीबीआयकडे काय देणार; देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल

Next
ठळक मुद्देराज्य सरकार आणि पोलीस पूजा चव्हाण प्रकरण दाबतायेत अशी राज्याचे माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी सणसणीत आरोप केला आहे.

पूजा चव्हाणआत्महत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना Shiv Sena  नेते संजय राठोड Sanjay Rathod यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील एक २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. काही ऑडिओ क्लिप्स फिरत आहेत. मात्र, या प्रकरणी राज्य सरकार आणि पोलीस पूजा चव्हाण प्रकरण दाबतायेत अशी राज्याचे माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी सणसणीत आरोप केला आहे. पूजा प्रकरण सीबीआयकडे सरकारनं द्यायला हवं का याबाबत विचारलं असता फडणवीसांनी जोरदार टीका केली. हे सरकार पोलिसांवरच इतका दबाव आणून प्रकरण दाबतंय. ते सीबीआयकडे काय देणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात मीडियाशी बोलताना स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी 'डेडिकेट' केलं बॉलिवूडमधील गाणं; तुम्हीच पाहा कोणतं!

तसेच फडणवीस म्हणाले, राज्यपालांनी एकही असंवैधनिक कृत्य केलेलं नाही. तसेच राज्याचं सरकार सारं काही स्वत:च्या मालकीचं असल्यासारखं वागतंय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मोठे आरोप केलेत. पोलिस कुठल्यातरी दबावाखाली कारवाई करत आहेत. तसेच माहिती लपवली जाते आहे, असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी याआधी देखील केले होते. 

अमृता फडणवीसांना काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे कार्यकर्तेच ट्रोल करतात; 'पतीदेवेंद्र' यांची चपराक

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील एक २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने  बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण असलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे. 

पोलीस महासंचालकांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस नमूद केले होते की, पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणातील १२ ऑडिओ क्लिप्स  माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या. आपल्या अवलोकनार्थ त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडत आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत, त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय, त्यातून पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे. सध्याचा तपास हा वरवर होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. ही आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद असल्याचा आरोप बंजारा समाजातून मोठ्या प्रमाणात होतो आहे. 

संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा आज सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतोय. या सोहळ्यात ख्यातनाम गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे; तसेच उदयोन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर यांचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात. या सोहळ्यास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित झाले आहेत. 

Web Title: SurJyotsna Awards 2021: Pooja Chavan case: What will this government give to CBI; Such is the thorny question of Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.