चक्रावून टाकणारी गोष्ट; वय ६३, ५ प्रेयसी आणि धंदा चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 08:55 PM2018-07-30T20:55:33+5:302018-07-30T20:56:10+5:30
५ प्रेयसींच्या खर्चासाठी करायचा चोरी
नवी दिल्ली - नवी दिल्ली पोलिसांना चक्रावून टाकणारा आरोपी हाती लागला आहे. या आरोपीचं नावं आहे बंधु सिंह, त्याचं वय ६३ असून या वयात त्याच्या ५ प्रेयसी आहेत. या प्रेयसीच्या उदरनिर्वाहासाठी तो चोऱ्या करायचा अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.
नवी दिल्लीतील सराय रोहिल्ला परिसरात अनेक चोऱ्या होत होत्या आणि याप्रकरणी गुन्हे दाखल होते. चार चोरीच्या गुन्ह्यात बंधु सिंह हा आरोपी वॉन्टेड होता. पोलीस याचा माग काढण्यासाठी कार्यरत होते. सराय रोहिल्ला इंडस्ट्रियल परिसरातील एका फॅक्टरीत चाचपणी करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये बंधु कैद झाला होता. या सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी बंधुच्या मुसक्या आवळल्या आणि बहुतांश चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली. बंधुला अटक करून पोलिसांनी २ लॅपटॉप, १ एलईडी आणि ५ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी चोऱ्या ५ प्रेयसीच्या खर्चासाठी करत होता. तो अविवाहित असून तो इतक्या वयात देखील शौकीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.