आत्मसमर्पित नक्षलवाद्याची गडचिराेलीत आत्महत्या, पतीपत्नी हाेते नक्षल दलममध्ये सक्रीय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 12:00 AM2022-03-09T00:00:44+5:302022-03-09T00:01:13+5:30
Gadchiroli News: दाेन वर्षांपूर्वी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी नवेगाव येथील आत्मसमर्पितांच्या वसाहतीत घडली.
गडचिराेली - दाेन वर्षांपूर्वी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी नवेगाव येथील आत्मसमर्पितांच्या वसाहतीत घडली. नकुल मट्टामी (वय ३५, रा. राजनांदगाव) असे मृतकाचे नाव आहे. ताे व त्याची पत्नी दाेघेही नक्षल दलममध्ये कार्यरत हाेते. २०१९ मध्ये दाेघांनीही गडचिराेली पाेलिसांसमाेर आत्मसमर्पण केले हाेते. हे जाेडपे गडचिराेली शहराजवळ असलेल्या नवेगाव येथील आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी बांधून दिलेल्या ‘नवजीवन’ वसाहतीमधील घरी राहत हाेते.
मंगळवारी वसाहतीजवळ असलेल्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत नकूल मट्टामीला तीन मुले आहेत. काैटुंबिक कारणातून मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
नवजीवन वसाहतीत सर्व आत्मसमर्पित नक्षलवादी राहतात. त्यांना उपजीविकेचे नवीन साधन मिळावे म्हणून पाेलीस विभागाच्या वतीने विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यातून अनेकांनी स्वयंराेजगार सुरू केला आहे.