सुशांत प्रकरणी सरकार, मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 09:08 PM2020-10-03T21:08:44+5:302020-10-03T21:09:25+5:30

Sushant Singh Rajput Case : राष्ट्रवादी काँग्रेसने केली मागणी 

In Sushant case, file a criminal case against those who defamed the government and Mumbai police | सुशांत प्रकरणी सरकार, मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा

सुशांत प्रकरणी सरकार, मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा

Next
ठळक मुद्देगेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आज पडदा पडला आहे. एम्स हॉस्पिटलने सुशांतने आत्महत्याच केली असे शिक्कामोर्तब केले आहे.

मुंबई - सुशांत सिंग रजपूत आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारची व मुंबईपोलिसांची बदनामी करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. 


गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आज पडदा पडला आहे. एम्स हॉस्पिटलने सुशांतने आत्महत्याच केली असे शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे सुशांत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर आणि महाविकास आघाडी सरकारवर आरोप करणारे आता तोंडघशी पडले आहेत. बिहारची निवडणूक नजरेसमोर ठेवून हा मुद्दा रंगवण्याचा अत्यंत गलिच्छ प्रकार भाजपाच्या प्रवक्त्यांनी केला होता. बिहार पोलिसांनीही सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता त्यामध्ये दावा करणारे बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे आता राजकारणात उतरले आहेत.

Read in English

Web Title: In Sushant case, file a criminal case against those who defamed the government and Mumbai police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.