दिपेश सावंतच्या अटकेप्रकरणी 'एनसीबी' अडचणीत, कोर्टाने मागितले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 04:35 PM2020-09-06T16:35:56+5:302020-09-06T16:42:43+5:30
कोर्टाने दिपेश सावंतला ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. मात्र, या निर्णयावरुन कायदेशीर वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरू आहे. राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतचा कर्मचारी दिपेश सावंत याला काल अटक केली होती. त्यानंतर आज एनसीबीने दिपेश सावंतला कोर्टात हजर केले.
कोर्टाने दिपेश सावंतला ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. मात्र, या निर्णयावरुन कायदेशीर वाद सुरू होण्याची शक्यता आहे. एनसीबीने दिपेश सावंतला बेकायदेशीर अटक केल्याचे दिपेश सावंतच्या वकिलांनी म्हटले आहे. तसेच, याप्रकरणी एनसीबीविरोधात अर्ज दाखल केला असून यावर कोर्टाने एनसीबीला उत्तर देण्यास सांगितले आहे, असे दिपेश सावंतचे वकील राजेंद्र राठोड यांनी म्हटले आहे.
वकील राजेंद्र राठोड म्हणाले, "दिपेश सावंत ४ सप्टेंबरपासून एनसीबीच्या कोठडीत आहे आणि त्याच्या कुटुंबीयांना याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. त्याला ताब्यात घेतल्यानंतर २४ तासांच्या आत कोर्टात हजर केले पाहिजे होते. २४ तासांपेक्षा जास्त काळ ताब्यात ठेवण्याच्या विरोधात आम्ही कोर्टात अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात कोर्टाने एनसीबीकडे उत्तर मागितले आहे."
He (Dipesh Sawant) was in their (NCB) custody since Sept 4, without his family being informed. He should've been produced before court within 24 hrs. We've filed a plea against him being kept in custody for over 24 hrs. Court has called for reply from NCB: Dipesh Sawant's lawyer https://t.co/BQ8AAGhANqpic.twitter.com/iI7qyZiGMr
— ANI (@ANI) September 6, 2020
दरम्यान, अंमली पदार्थ प्रकरणी आतापर्यंत दिपेश सावंत, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडासह सात जणांना अटक झाली आहे. यापैकी दीपेश, शौविक, सॅम्युअल, जैद यांची समोरासमोर बसवून चौकशी सुरू आहे.
रियाचा भाऊ शौविक आणि मिरांडालाही अटक
काल सकाळी सहा वाजताच्या सुमारास सुशांतची गर्लफ्रेंड रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने छापेमारी केली. यानंतर रियाचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, जिथे त्यांची चौकशी केली. यावेळी सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले. यानंतर शौविक आणि मिरांडा यांना NDPS Act अंतर्गत एनसीबीकडून अटक केली गेली आहे.
आणखी बातम्या...
- सहा सरकारी बँकाच्या खासगीकरणावर भाजपाचा डोळा, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप
- राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करा अन् शरद पवारांना अध्यक्ष बनवा; रामदास आठवलेंची सूचना
- 'ना भूले हैं, ना भूलने देंगे'; सुशांतच्या मृत्यूवरून राजकारण, भाजपाने छापले स्टिकर्स
- "२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला
- "स्वत:चे ट्विटर हँडल स्वत: वापरावे, राजकीय पक्षांना देऊ नये", संजय राऊतांचा कंगना राणौतला टोला
- BSNL कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार, खर्चात काटकसर करण्याचे आदेश
- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'
- मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान