सुशांतच्या बहिणीसोबत CBI आणि एम्सच्या डॉक्टरांची टीम पोहचली सुशांतच्या घरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 03:14 PM2020-09-05T15:14:22+5:302020-09-05T15:16:07+5:30

Sushant Singh Rajput Case : सुशांतच्या मृत्यूचा क्राईम सीन रिक्रिएट करणार 

Sushant Singh Rajput Case : Along with Sushant's sister, a team of CBI and AIIMS doctors reached Sushant's house | सुशांतच्या बहिणीसोबत CBI आणि एम्सच्या डॉक्टरांची टीम पोहचली सुशांतच्या घरी 

सुशांतच्या बहिणीसोबत CBI आणि एम्सच्या डॉक्टरांची टीम पोहचली सुशांतच्या घरी 

Next
ठळक मुद्देया प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय टीम आज मुंबईतील सुशांत सिंग याच्या घरी पोहचली आहे. सीबीआयची टीम वांद्रे येथील सुशांतच्या घरी त्याच्या बहिणीसह पोहोचली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील ड्रग्जच्या संबंधात रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीने शुक्रवारी अटक केली होती. या दोघांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना ७ दिवसांची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय टीम आज मुंबईतील सुशांत सिंग याच्या घरी पोहचली आहे. सीबीआयची टीम वांद्रे येथील सुशांतच्या घरी त्याच्या बहिणीसह पोहोचली आहे.

सुशांत सिंहची बहीण मितु सिंगही सीबीआयच्या टीमसोबत आहे. या टीमसोबत दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे डॉक्टरही आहेत. सिद्धार्थ पिठानी, नीरजसुद्धा सुशांतच्या घरी उपस्थित आहेत. क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी सीबीआयचे पथक सुशांतच्या घरी पोहोचले आहे. असे सांगितले जात आहे की, सीबीआय टीम सुशांतच्या घरी क्राईम सीन रिक्रिएट करेल जेणेकरुन त्या दिवशी नेमके काय घडले याची माहिती मिळू शकेल.
 

यापूर्वी सीबीआयच्या पथकाने सुशांत सिंग राजपूत याच्या घरी दोनदा क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आला होता. त्यावेळी सीबीआयचे फॉरेन्सिक तज्ज्ञ त्यांच्यासमवेत होते. यावेळी एम्सचे डॉक्टर तिथे पोहोचले आहेत. तर क्राईम सीन  नव्या पद्धतीने रिक्रिएट केला जाईल. या घटनेच्या वेळी सिद्धार्थ, केशव आणि नीरज घरी होते. सुशांत सिंगच्या मृत्यूची बातमी समजताच मीतू सिंगही तिथे पोहोचली होती.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

 

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर

 

मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

Web Title: Sushant Singh Rajput Case : Along with Sushant's sister, a team of CBI and AIIMS doctors reached Sushant's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.