दीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवनाबाबत तिघींकडून इन्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 08:28 PM2020-09-26T20:28:20+5:302020-09-26T20:29:54+5:30
Sushant Singh Rajput Case : क्लिनचिट नाही, मात्र तूर्तास पुन्हा चौकशीही नाही
जमीर काझी
मुंबई - जगभरात करोडो चाहते असलेल्या बॉलिवूडसाठी शनिवारचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण ठरला. आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा खान आणि श्रद्धा कपूर यांची ड्रग्ज सेवनाबद्दल जवळपास साडे पाच तासाची स्वतंत्रपणे कसून चौकशी करण्यात आली. तिघीनीं ड्रग्जबाबत अप्रत्यक्ष संपर्क आल्याची कबुली दिली असली त्याचे सेवनाचा ठामपणे इन्कार केला असल्याचे समजते.
तिघींनी अनेक प्रश्नांवर असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्यांना क्लिनचिट देण्यात आलेली नाही.मात्र त्यांना तूर्तास तातडीने पुन्हा चौकशीसाठी बोलाविले जाणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दीपिकाने तिची मॅनेजर करिष्मा प्रकाशसमवेतचा ड्रगचॅट मान्य केला मात्र आपण पार्टीत ड्रग घेतले नसल्याचे सांगितले. तर सारा व श्रद्धा यांनी अनुक्रमे केदारनाथ व छीच्छोरे चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सुशांत ड्रग्ज घेत होता, आपण मात्र त्यापासून अलिप्त होतो अशी कबुली दिली आहे. श्रद्धाने सीबीडी ऑइल सेवनासाठी नाही तर अंग दुखत असल्याने मागविले होते, असा जबाब दिला असल्याचे सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी जया साहा हिने दिलेल्या माहितीतून आघाडीच्या अभिनेत्रीची नावे पुढे आल्याने बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एनसीबीने तिघींना समन्स बजाविल्यानंतर तिघीनी शनिवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावली.
ड्रग्जचॅट केला पण सेवन नाही - दीपिका
सर्वप्रथम दीपिका सकाळी 9.50 वाजल्याचा सुमारास पोहचली. थोड्या वेळानंतर तिची मॅनेजर करिष्मा प्रकाशही आली. त्यांच्याकडे अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे चौकशी सुरु केली.त्यावेळी दोघीचे मोबाईल फोन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. सुमारे दीड तासानंतर करिष्माला तिच्यासमोर बसवून पाच अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. व्हाट्सअप चॅट, कोको पार्टीबाबत सविस्तर विचारणा करण्यात आली. तिने ऍडमिन असलेल्या व्हॉटस अप ग्रुपवर तसे जयाबरोबरील ड्रग चॅटची कबुली दिली. मात्र आपण कधीही ड्रग्ज सेवन केले नसल्याचे सांगितल्याचे समजते. सुमारे साडे तीनच्या सुमारास दीपिकाकडील आजची चौकशी थांबविण्यात आली.
'केदारनाथ'वेळी सुशांत गांजा घेत होता - सारा
सारा खान दुपारी एकच्या सुमारास एनसीबीच्या कार्यालयात पोहचली. तिच्याकडे सुशांतसिहबद्दल, त्याच्या व्यसनाबद्दल केदारनाथ चित्रपट आणि थायलंडच्या ट्रिपबद्दल सविस्तर माहिती विचारण्यात आले. शुटिंगच्यावेळी सुशांत गांजा, चरस घेत होता,सेटवर बहुताशजणाना त्याबद्दल माहिती होती. आपण मात्र कधीही त्याचे सेवन केले नाही, तसेच कोणत्याही ड्रग तस्कराला ओळखत नसल्याची माहिती दिली असल्याचे सांगितले. तिचा चालक रईसने ड्रग्ज सेवनाबद्दलचा आरोप तिने फेटाळून लावला असल्याचे सांगण्यात आले. तिला साडेपाचच्या सुमारास कार्यालयातून सोडण्यात आले.
पवना पार्टीत ड्रग्जचा वापर-श्रद्धा
श्रद्धा कपूर दुपारी बाराच्या सुमारास कार्यालयात पोहचली. तिने आपल्या जया साहा हिच्या मार्फत सीबीडी ऑईल मागितल्याची कबुली दिली. मात्र आपण ते सेवन केले नाही. तर अंग दुखत असल्याने मागितल्याचे सांगितले. सुशांत हा ड्रग्ज घेत असल्याचे माहित होते. 'छीच्छोरे 'च्या वेळी तो गांजा घेत होता, त्याच्याकडून पवना येथील पार्टीत मद्य, ड्रग्जचा वापर होत असे. मी पार्टीत, तेथील नाचगाण्यात सहभागी होत असे मात्र आपण कधीही ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे तिने सांगितले आहे. चौकशी संपल्यानंतर सुमारे पावणे सहाच्या सुमारास ती एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडली.
एनसीबी गेस्ट हाऊसबाहेर बंदोबस्त
दीपिका एनसीबी गेस्ट हाऊसमध्ये येणार असल्यामुळे गेस्ट हाऊसबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मीडियाने गर्दी करू नये म्हणून गेस्ट हाऊसबाहेर बॅरेकेड्स लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे तिच्या येथील घराबाहेर मीडियाने मोठी गर्दी केल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, दीपिका शुक्रवारी रात्री घरी न जाता एका पंचतारांकित हॉटेलात थांबली होती. तिचा पती रणवीर सिह व तिने तेथे रात्री उशिरापर्यंत वकिलाशी चर्चा केली. त्यानंतर सकाळी तेथूनच एनसीबीच्या कार्यालयात एकटीच गेली. मीडियाचा ससेमिरा चुकविण्यासाठीच तिने ही शक्कल लढविली होती.
मुंबई - दीपिकाची आजची जवळपास साडेपाच चौकशी झाल्यानंतर घरच्या दिशेने ती झाली रवाना pic.twitter.com/mSeobW7Rqf
— Lokmat (@MiLOKMAT) September 26, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे
Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया
एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप
बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!
धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या
विदेशी फेसबुक फ्रेंडने फसविले, गिफ्ट पाठविण्याची केली बतावणी
दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या
दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन
NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक