सुशांत प्रकरण : ड्रग्स पेडलर्सविरोधातील तपासाला वेग, मुंबई-गोव्यात अनेक ठिकाणी NCBचे छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 01:58 PM2020-09-12T13:58:15+5:302020-09-12T14:11:55+5:30

चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे, एनसीबीच्या पथकाने ड्रग्स पेडलर्सच्या ठिकानांवर छापे टाकले. अनुज केशवानीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, एनसीबीच्या पथकाने ही छापेमारी केली.

sushant singh rajput case drugs angle ncb raid in mumbai and goa | सुशांत प्रकरण : ड्रग्स पेडलर्सविरोधातील तपासाला वेग, मुंबई-गोव्यात अनेक ठिकाणी NCBचे छापे

सुशांत प्रकरण : ड्रग्स पेडलर्सविरोधातील तपासाला वेग, मुंबई-गोव्यात अनेक ठिकाणी NCBचे छापे

Next
ठळक मुद्देएनसीबीने ड्रग्स माफियांविरोधात कारवाई सुरू केली आहे.एनसीबीने शनिवारी सकाळी महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि गोव्यात अनेक ठिकाणी छापे टाकले.अनुज केशवानीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, एनसीबीच्या पथकाने ही छापेमारी केली.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स अँगलचा तपास करत असलेल्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) तपासाला आता आणखी वेग आला आहे. याप्रकरणी रिया चक्रवर्तीसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने ड्रग्स माफियांविरोधात कारवाई सुरू केली आहे. एनसीबीने शनिवारी सकाळी महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि गोव्यात अनेक ठिकाणी छापे टाकले.

एनसीबीची छापेमारी -
चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे, एनसीबीच्या पथकाने ड्रग्स पेडलर्सच्या ठिकानांवर छापे टाकले. अनुज केशवानीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, एनसीबीच्या पथकाने ही छापेमारी केली. अनुजने चौकशीदरम्यान ड्रग्स पेडलर्सच्या ठिकानांची आणि त्यांच्याशी संबंधित बरीच माहिती एनसीबीला दिल्याचे बोलले जात आहे.

समीर वानखेडे हे गोव्यात छापेमारी करत असलेल्या एनसीबीच्या पथकाचे नेतृत्व करत आहेत. मुंबई आणि गोव्यात करण्यात आलेली छापेमारी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेला ड्रग्स अँगल आणि रिया चक्रवर्तीशी संबंधित असल्याचे समजते. याशिवाय कैजाननंतर अनुज केशवानीला अटक करण्यात आली होती. रिया चक्रवर्तीशी संबंधित प्रकरणात कैजानने अनुजचे नाव घेतले होते. यानंतर एनसीबीने अनुजला अटक केली होती.  

एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ड्रग्स अँगलने  चौकशी करत असलेले अधिकारीही मुंबईवरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने सहभागी झाले होते. 

दिल्लीत झालेल्या या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी एनसीबीने ड्रग्स पेडलर्सच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी केली. याप्रकरणी एनसीबीने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि इतर 4 जणांना अटक केली आहे. एनसीबीच्या चौकशीत रियाने अनेक मोठ्या नावांचा उल्लेख केला आहे. त्यांच्याविरोधात एनसीबी लवकरच कारवाई करू शकते.

रियाने सारा अली खान, रकुलप्रीत सिंहसह अनेकांची घेतली नावे -
रिया चक्रवर्तीच्या ड्रग्स स्टोरीमध्ये सारा अली खानसोबतच बॉलिवूडमधील 4 मोठी नावे समोर आली आहेत. रियाने या तीन लोकांची नावे एनसीबीला सांगितली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एससीबी या पाच लोकांवर लवकरच कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.

एनसीबीसमोर रियाने जी नावे घेतली त्यात अभिनेत्री सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि डिझायनर सिमोन खंबाटा यांच्या नावांचा समावेश आहे. एनसीबी त्यांना समन पाठवण्याचीही दाट शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!

'या' दोन सरकारी बँकांच्या ग्राहकांसाठी भारी गिफ्ट, एकाच वेळी घेतला मोठा निर्णय

Web Title: sushant singh rajput case drugs angle ncb raid in mumbai and goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.