Sushant Singh Rajput Case : ईडीकडून गौरव आर्याची आठ तासाहून अधिक वेळ झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 10:16 PM2020-08-31T22:16:04+5:302020-08-31T22:16:26+5:30
Sushant Singh Rajput Case : ड्रग कनेक्शनच्या माध्यमातून जोडला गेलेला गोव्यातील हॉटेल व्यवसायिक गौरव आर्या याची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने कसून झाडाझडती घेतली.
मुंबई - सुशांत राजपूतचा मृत्यू प्रकरणात ड्रग कनेक्शनच्या माध्यमातून जोडला गेलेला गोव्यातील हॉटेल व्यवसायिक गौरव आर्या याची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने कसून झाडाझडती घेतली. सुमारे आठ तासाहून अधिक काळ त्याच्याकडे चौकशी सुरु होती.
सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्तीशी असलेले संबंध, आर्थिक व्यवहार आणि तिला ड्रग पुरविण्याबाबतचा तपशिला बाबत त्याच्याकडून माहिती घेण्यात येत आहे. त्याच्याकडे आवश्यकतेनुसार आणखी काही दिवस चॊकशी केली जाणार आहे, असे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
गेल्या आठवड्यात ईडीने त्याला नोटीस बजावून 31 ऑगस्टला चौकशीसाठी कार्यालयात हजर रहाण्यास कळविले होते. त्यानुसार सोमवारी अकराच्या सुमारास तो बेलार्ड पियर्ड येथील कार्यालयात हजर झाला. अधिकाऱ्यांकडून त्याला सुशांत, रिया यांच्याशी संबंध , त्यांना ड्रग पुरविणे, आर्थिक व्यवहाराबाबत विचारणा करण्यात आली. त्याने सुशांतला आपण कधीही भेटलो नव्हतो, त्याच्याशी परिचय नव्हता असे सांगितले असल्याचे समजते. मात्र रियाला 2017 पासून ओळखत होतो, एका जाहिरातीच्या शूटिंगच्या निमित्याने तिच्याशी परिचय झाला होता, तिच्याशी संपर्कात असल्याचे सांगितले आहे. मात्र तिला ड्रग पुरविण्याबाबत ,तिच्याशी व्हाट्सअप मोबाईलवरील चॅट आणि त्याचे मुंबईतील इतर सहकारीबाबत कसून विचारणा त्याच्याकडे करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीनंतर गौरव आर्याकडे सीबीआय आणि उत्तेजक द्रव्य बाळगणे आणि तस्करीबाबत गुन्हा दाखल केलेल्या एनसीबीकडून चौकशी केली जाणार आहे.
Mumbai: Gaurav Arya, owner of The Tamarind Hotel, Goa arrives at Enforcement Directorate office, in connection with
— ANI (@ANI) August 31, 2020
Sushant Singh Rajput death case pic.twitter.com/ekSd1JQHcB
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस सज्ज, ३५ हजार पोलिसांचा फ़ौजफाटा तैनात
सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट
संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती
जंगलात आढळला शिर नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करून हत्या केल्याची शक्यता
Coronavirus : सहा दिवसांत दुसरा पोलीस ठरला कोरोनाचा बळी; गमावले तीन योद्धे