Sushant Singh Rajput Case : सीबीआयकडून रियाच्या वडिलांची सलग तिसऱ्यादिवशी झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 08:54 PM2020-09-03T20:54:32+5:302020-09-03T20:55:03+5:30
Sushant Singh Rajput Case : सलग तिसऱ्या दिवशी त्याच्याकडे आठ तास चौकशी करण्यात आली असून रिया, शोविकच्या ड्रग कनेक्शनबाबत विचारणा करण्यात आली.
मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष पथकाकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची चौकशी सुरूच आहे. सलग तिसऱ्या दिवशी त्याच्याकडे आठ तास चौकशी करण्यात आली असून रिया, शोविकच्या ड्रग कनेक्शनबाबत विचारणा करण्यात आली.
गेले दोन दिवस इंद्रजित व पत्नी संध्या चक्रवर्ती यांची 14 तास सखोल विचारणा करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास इंद्रजित पुन्हा डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये पोहचले.त्यांच्याबरोबर सिद्धार्थ पिठानी याच्याकडेही चौकशी करण्यात आली. सुशांत, रियाचे संबंध, त्यांच्यातील वाद, ड्रगच्या सेवनाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यांना परत रिया, सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंग, श्रुती मोदी यांची समोरासमोर बसून विचारणा करण्यात येईल,असे सूत्राकडून सांगण्यात आले.
रिया व चक्रवर्ती कुटूंबियाला एनसीबीकडून समन्स
अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या रिया व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती या दोघांना चौकशीला पाचारण करण्यात येणार आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या अनुषंगाने सीबीआयचा बहुताश तपास पूर्ण झाला आहे.त्यामुळे त्यांच्याकडे ड्रग कनेक्शनबाबत तपास करण्यात येईल,असे सांगण्यात आले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक
आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा
सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर
ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा