सुशांत प्रकरणी मोबाईल कॉल डिटेल्समधून धक्कादायक माहिती उघड, संदीप सिंग होता मुंबई पोलिसांच्या संपर्कात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 10:38 PM2020-08-26T22:38:44+5:302020-08-26T22:41:12+5:30
Sushant singh Rajput Case : व नेणाऱ्या वाहन चालकाप्रमाणे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बांद्रा पोलिस ठाण्यातील निरीक्षक भूषण बेळणेकर आणि उपनिरीक्षक जगताप याच्याशी संर्पकात होता.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याचा मित्र व दिग्दर्शक संदीप सिंग हा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वांद्रे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्याही संपर्कात होता, त्याच्या मोबाईल कॉल डिटेल्समधून ही धक्कादायक बाब पुढे आली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर संदीप सिंगचे कॉल रेकॉर्ड हाती लागले आहेत. त्यामध्ये शव नेणाऱ्या वाहन चालकाप्रमाणे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बांद्रा पोलिस ठाण्यातील निरीक्षक भूषण बेळणेकर आणि उपनिरीक्षक जगताप याच्याशी संर्पकात होता. त्यामागिल कारण काय, याबाबीचा सखोल तपास सीबीआय करणार आहे.
सुशांतचा 14 जूनला मृत्यू झाल्यानंतर संदीप सतत पुढे होता. सुशांतचं आधार कार्ड, पॅनकार्डही त्याच्याकडे होतं. संदीप सुशांतचा मित्र असला तरी तो गेल्या एक वर्षापासून त्याच्या संपर्कात नव्हता. पण सुशांतच्या मृत्यूनंतर अचानक तो शेवटच्या सोपस्कारात आघाडीवर होता. कूपर रुग्णालयातही रियाला त्यानेच प्रवेश मिळवून दिला होता.त्यामुळे त्याच्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळू लागले आहे. नेपोटिझम, डिप्रेशन, काळी जादू आणि नंतर आर्थिक फसवणूकनंतर तो आता अमली पदार्थ सेवनापर्यंत येऊन पोहोचला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?