Sushant Singh Rajput Case : शोविक आणि सॅम्युअलला ९ सप्टेंबरपर्यंत NCBची कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 04:49 PM2020-09-05T16:49:49+5:302020-09-05T16:50:45+5:30
Sushant Singh Rajput Case : अजून एका कैझन इब्राहिम नावाच्या आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. नुकतेच कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
मुंबई - एनसीबीने काल रात्री रियाचा भाऊ शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना अटक केली. त्यांनतर त्यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने त्या दोघांना नऊ सप्टेंबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अजून एका कैझन इब्राहिम नावाच्या आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. नुकतेच कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
शोविक आणि सॅम्युअलच्या अटकेमुळे सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिने चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांना अमली पदार्थाबाबतचे माहिती का मिळू शकली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शोविकनंतर एनसीबी रियाला ताब्यात घेण्याची शक्यता आहे. शोविक, मिरांडा यांनी सुशांतला नशेशी लत लावून अमली पदार्थ पुरवल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. दरम्यान अंमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी शोविक आणि सॅम्युअल मिरांडाला कोर्टात आणण्याआधी सायन रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. या दोघांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
Showik Chakraborty and Samuel Miranda reach NCB office in Mumbai; the duo has been sent to NCB custody till September 9. #SushantSinghRajputCasepic.twitter.com/MA1dTY2oLd
— ANI (@ANI) September 5, 2020
एनसीबीनं रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला कार्यालयात आणलं; दोघांना ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी #RheaChakraborty#ShowikChakraborty#SushantSinghRajputDeathCasehttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/HfwStyvpX1
— Lokmat (@MiLOKMAT) September 5, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल
महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर
मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक