Sushant Singh Rajput Case : सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच, एम्सचा अंतिम अहवाल सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 08:45 PM2020-10-03T20:45:07+5:302020-10-03T20:46:16+5:30
Sushant Singh Rajput Case : सीबीआयच्या विनंतीनुसार सुशांतच्या मृत्यूसंदर्भात वैद्यकीय-कायदेशीर मत देण्यास ते बनविण्यात आले होते.७ सप्टेंबरला त्यांच्याकडे व्हिसेरा पाठविण्यात आला होता. त्याबाबत मंगळवारी अंतिम अहवाल देण्यात आला आहे.
मुंबई - अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) च्या न्यायवैद्यक विभागाने केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) दिलेल्या अहवालात बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचा मृत्यू आत्महत्या नव्हे तर आत्महत्या असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे, अशी माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पाच वैद्यकीय अधिकाऱ्याचे मंडळ बनविण्यात आले होते. सीबीआयच्या विनंतीनुसार सुशांतच्या मृत्यूसंदर्भात वैद्यकीय-कायदेशीर मत देण्यास ते बनविण्यात आले होते.७ सप्टेंबरला त्यांच्याकडे व्हिसेरा पाठविण्यात आला होता. त्याबाबत मंगळवारी अंतिम अहवाल देण्यात आला आहे.
त्यामध्ये हत्याच्या अनुषंगाने एकही बाब समोर आली नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे आता सीबीआयच्या तपासातून हत्या हा अँगल बाजूला करून त्याला आत्महत्या करण्यास परावृत करण्यात आले का, यावरच भर देण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक टीमने आपल्या अहवालात सुशांतच्या मृत्यूचे आत्महत्येचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सुशांतचे वडील के.के.सिह यांच्या वकिलांनी मीडियासमोर येऊन 'विषबाधा' आणि 'गळा आवळून' त्याला मारण्यात आल्याचे दावे खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहेत. अहवालात त्याचा मृत्यू गळा दाबून किंवा रासायनिक विषबाधा नसल्याचे नमूद केले आहे. सीबीआयने याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. सर्व शक्यता पडताळून चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले होते. व्यावसायिक तपास करीत असून त्यामध्ये सर्व बाबींकडे पाहिले जात आहे आणि आजपर्यंत कुठल्याही घटनेस नकार देण्यात आला नाही.
पाकिस्तानच्या Whats App ग्रुपवर लष्करी हद्दीचे छायाचित्रे टाकणारा परप्रांतीय ताब्यात
सुशांत 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील माँट ब्लँक अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतचा खून झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी उपस्थित केला. या बाबत त्याची गर्लफ्रेंड व अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिचा भाऊ व वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची ईडी, सीबीआयने सखोल चौकशी केली. रियाच्या Whats App चॅटवरून ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर त्याबाबत एनसीबीकडे स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला असून तिला, भाऊ शोविक, सुशांतचे मॅनेजर, नोकरांना अटक करण्यात आली असून सध्या सर्वजण न्यायालयीन कोठडी आहेत.