युवा नेत्याची मोठी तयारी! सीबीआयसमोर स्वत: जाणार; भाजपाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 02:16 PM2020-08-21T14:16:16+5:302020-08-21T15:37:41+5:30

#CBIInMumbai : सीबीआयचे तपास अधिकारी मुंबईत आले असून त्यांनी डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली आहे. सीबीआयने दोन टीम बनविल्या असून एक टीम बांद्र्यातील पोलीस ठाण्यात गेली होती. तर दुसरी टीम सुशांतच्या घरी डमी टेस्टची तयारी करत आहे.

Sushant Singh Rajput Death Case: young politician might present himself before CBI: BJP | युवा नेत्याची मोठी तयारी! सीबीआयसमोर स्वत: जाणार; भाजपाचा आरोप

युवा नेत्याची मोठी तयारी! सीबीआयसमोर स्वत: जाणार; भाजपाचा आरोप

Next

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput death case) च्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे गेला असून तपास पथकाने महत्वाचे पुरावे, कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. तसेच सुशांतचा कुक नीरज याची चौकशीही करण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडींवर भाजपाचे प्रवक्ते सुरेश नखुआ यांनी एका युवा नेत्याकडे नाव न घेता बोट दाखवत या नेत्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा नेता ईमेज चमकविण्याच्या उद्देशाने मोठ्या तयारीनिशी स्वत: सीबीआयच्या समोर जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 


नखुआ यांनी कोणाचे नाव घेतले नाही. मात्र, काही विश्वासू सुत्रांनी ही माहिती दिल्याचे ते म्हणाले. या सुत्रांनुसार एक युवा नेता आपली इमेज वाचविण्यासाठी सीबीआयसमोर न बोलाविता जाऊ शकतो. आज किंवा उद्या हा नेता सीबीआय चौकशीसाठी हजर राहू शकतो. यासाठी मोठी प्रसिद्धी मिळविण्यासाठी प्लॅन आखला जात असल्याचे नखुआ यांनी म्हटले. 


हा युवा नेता सुशांत प्रकरणात हे सिद्ध करू इच्छित आहे की, त्याने काही केलेले नाही. यामुळे स्वत: सीबीआयच्या समोर हजर झालो. कोणाचे नाव घेत नाही, पण सर्वकाही आपोआपच समोर येईल, असे ते म्हणाले. आतापपर्यंत या केसमध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव आलेले नाहीय. सुशांतच्या वडिलांनीही एफआयआरमध्ये कोणा नेत्याचे नाव घेतलेले नाही. 



सीबीआयचे तपास अधिकारी मुंबईत आले असून त्यांनी डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली आहे. सीबीआयने दोन टीम बनविल्या असून एक टीम बांद्र्यातील पोलीस ठाण्यात गेली होती. तर दुसरी टीम सुशांतच्या घरी डमी टेस्टची तयारी करत आहे. बांद्रा पोलिसांकडून सीबीआयने सुशांतची डायरी, कपडे, फोन, लॅपटॉप आदी ताब्यात घेतेले आहेत. या टीमचे नेतृत्व एसपी अनिल यादव करत असून फॉरेन्सिक तयारी करत असलेल्या टीमचे नेतृत्व एसपी नुपूर यादव या करत आहेत. 

नितेश राणेंनी घेतले आदित्य ठाकरेंचे नाव...

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून भाजपा नेते नितेश राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष केलं आहे. शिवसेनेत जुने विरुद्ध नवे असा संघर्ष सुरू असून त्यातूनच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला फक्त आदित्य ठाकरेंचं नावच का घ्यावंसं वाटलं, त्यांना कधीच भेटलो हे का सांगावंसं वाटलं, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आम्ही सीबीआयला या दृष्टीनं तपास करण्याची विनंती करणार असून त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचीदेखील आमची तयारी असल्याचं ते म्हणाले.

शरद पवारांच्या पावलावर पाऊल?

विधानसभा निवडणुकीआधी सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका मोठ्या कथित घोटाळ्यात ईडीने नोटीस पाठविली होती. यावेळी शरद पवारांनाही नोटीस पाठविल्याचे सांगितले जात होते. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण खराब करण्याचा डाव ओळखून पवारांनी स्वत:च ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली होती. अखेर ईडीलाही शरद पवारांना कोणतीही नोटीस पाठविली नसल्याचे जाहीर करावे लागले होते. तसाच काहीसा प्लॅन सुशांत राजपूतच्या सीबीआय चौकशीत आखला जात आहे, याकडे भाजपाच्या प्रवक्त्याने बोट दाखविले आहे. 

ईडीविरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी जसा गेम प्लॅन आखला तसाच प्रयत्न होत आहे.

 


 

अन्य महत्वाच्या बातम्या...

किम जोंग उन संकटात; बहिणीला बनविले उत्तराधिकारी? दिली मोठी जबाबदारी

भारतीयांची घोर फसवणूक! Made in PRC लिहून चिनी उत्पादने विकताहेत 'स्वदेशी' कंपन्या

'पती खूप प्रेम करतो, श्वास कोंडतोय!', नवविवाहितेला हवाय तलाक; कारणे वाचून व्हाल अवाक्

कुटील पाकिस्तान! चीनी युद्धनौकांच्या सर्वात मोठ्या तळावर पाठविला दूत; भारताविरोधात तीन प्रस्ताव

CoronaVirus Lockdown: खूशखबर! नोकरी गमावलेल्यांना तीन महिन्यांचे निम्मे वेतन मिळणार; लॉकडाऊनमुळे प्रस्ताव

शेतकऱ्यांना मोदी सरकारची मोठी मदत; कमी व्याजाच्या 1.22 कोटी किसान क्रेडिट कार्डचे वाटप

Gold Rates Today: सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर

मस्तच! गुगलकडे आहेत 20 लाख 'नोकऱ्या'; जॉब शोधण्यासाठी अ‍ॅप लाँच

तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले

Web Title: Sushant Singh Rajput Death Case: young politician might present himself before CBI: BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.