Sushant Singh Rajput: दिग्दर्शक शेखर कपूर यांची होणार चौकशी? सुशांतच्या आत्महत्येनंतर केली होती पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 06:44 IST2020-07-01T02:28:31+5:302020-07-01T06:44:07+5:30
सुशांतने आत्महत्या केल्याच्या दुसऱ्या दिवशीच कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली. त्यात ‘तू कोणत्या दुखण्यातून जात होतास याची कल्पना आहे.

Sushant Singh Rajput: दिग्दर्शक शेखर कपूर यांची होणार चौकशी? सुशांतच्या आत्महत्येनंतर केली होती पोस्ट
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी दिग्दर्शक शेखर कपूर यांचा जबाब पोलीस नोंदविणार आहे.
सुशांतसोबत शेखर कपूर ‘पाणी’ या चित्रपटावर काम करत होते. मात्र, नंतर यशराज फिल्म्ससोबत काही खटकले आणि तो प्रोजेक्ट बारगळला.
सुशांतने आत्महत्या केल्याच्या दुसऱ्या दिवशीच कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली. त्यात ‘तू कोणत्या दुखण्यातून जात होतास याची कल्पना आहे. तुला हे पाऊल उचलण्यास भाग पाडणाऱ्यांबाबत मला कल्पना आहे, कारण माझ्या खांद्यावर तू डोके ठेवून रडला होतास. गेल्या सहा महिन्यात मी तुझ्यासोबत असतो किंवा तुला भेटता आले असते, पण जे घडले ते त्यांचे कर्म, तुझे नाही’, अशी पोस्ट त्यांनी टाकली होती. त्यामुळे त्यांचे काय म्हणणे आहे याची शहानिशा वांद्रे पोलीस करणार आहेत.