Sushant singh Rajput : ड्रग्स प्रकरणाचं दुबई कनेक्शन समोर; अखेर मुख्य संशयिताची NCBला ओळख पटली  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 07:47 PM2021-04-15T19:47:12+5:302021-04-15T19:47:48+5:30

Sushant singh Rajput : हा आरोपी साहिल शाह ऊर्फ फ्लाको दुबईत लपून बसला आहे. 

Sushant singh Rajput: Drugs case in front of Dubai connection; The main suspect was eventually identified by the NCB | Sushant singh Rajput : ड्रग्स प्रकरणाचं दुबई कनेक्शन समोर; अखेर मुख्य संशयिताची NCBला ओळख पटली  

Sushant singh Rajput : ड्रग्स प्रकरणाचं दुबई कनेक्शन समोर; अखेर मुख्य संशयिताची NCBला ओळख पटली  

googlenewsNext
ठळक मुद्दे साहिल घरात राहत नाही, परदेशात असतो. फक्त फोन किंवा Whats App कॉलवर संपर्कात राहतो, असं त्याच्या घरातल्यांनी सांगितलं.

बहुचर्चित सुशांत सिंग राजपूत मृत्यनंतर उघडकीस आलेल्या प्रकरणाचं दुबई कनेक्शन आता समोर आलं आहे. जवळपास ६ ते ७ महिन्यांच्या प्रयत्नांनंतर मुख्य संशयित आरोपीची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) ओळख पटवली आहे. हा आरोपी साहिल शाह ऊर्फ फ्लाको दुबईत लपून बसला आहे. 

सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशी दरम्यान एनसीबीने सोमवारी रात्री छापेमारी केली. सुशांत याआधी राहत असलेल्या मालाड भागातील इंटरफेस हाईटच्या ई विंगमध्ये छापा टाकला होता. यावेळी साहिल शाहची ओळख पटली. घरात त्याची आई आणि एक महिला होती. साहिल घरात राहत नाही, परदेशात असतो. फक्त फोन किंवा Whats App कॉलवर संपर्कात राहतो, असं त्याच्या घरातल्यांनी सांगितलं. या धाडीत साहिलच्या घरातून क्युरेटेड नार्दन अमेरिकन बड्स जप्त करण्यात आल्या.

सुशांत प्रकरणात काही महिन्यांपूर्वी ड्रग्ज पेडलर अब्बास आणि जैद या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशी दरम्यान साहिलचे नाव समोर आले होते. तेव्हापासून एनसीबी साहिलच्या मागावर आहे. परंतु आजपर्यंत तो सापडला नाही, त्याचा शोध सुरुच आहे. साहिल शाह उर्फ फ्लाको हा मालाडच्या इंटरफेस हाईट्स इमारतीमधला रहिवासी आहे. याच इमारतीत सुशांत सिंग राजपूत पूर्वी राहत होता. साहिल शाह गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर आतापर्यंत मारामारी, धमकावणे अशा अनेक केसेस आहेत. मात्र, तो दुबईला पळून जाऊन तिथूनच आपला ड्रग्जचा काळा धंदा करत असल्याची माहिती मिळत आहे. 

 

Web Title: Sushant singh Rajput: Drugs case in front of Dubai connection; The main suspect was eventually identified by the NCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.