“कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करण्याची आमची औकात नाही; न्यायालयाची प्रतिमा जपली नाही तर…”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 06:12 PM2020-08-06T18:12:28+5:302020-08-06T18:15:46+5:30
तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सोडणार की नाही? हे सांगावे, अथवा लिखित द्यावं आम्ही बिहारच्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. हा सगळा खेळ लावला आहे, संपूर्ण देश बघत आहे. असं बिहारचे डीजीपी म्हणाले.
पटना – सुशांत प्रकरणात सत्य जनतेसमोर यावं ही सगळ्यांची इच्छा आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केले जात नाही. सुप्रीम कोर्ट देशाचं सर्वोच्च न्यायालय आहे. तरीही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचंही मुंबई पोलीस उल्लंघन करत आहे. मुंबई पोलीस सुप्रीम कोर्टाचं उल्लंघन करत आहे, आमची औकात नाही, आम्ही छोट्या न्यायालयाचा आदेशही मानतो, सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, न्यायालयाची प्रतिमा आहे ती जपली पाहिजे असं बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितले.
याबाबत गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, न्यायालयाची प्रतिमा जपली नाही तर लोकशाही संकटात येईल, न्यायालयाच्या आदेशानंतर आम्ही मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे. आमच्या एसपींना कैदी बनवून त्याठिकाणी ठेवलं आहे. सर्वोच्च न्यायालयावर जनतेचा विश्वास आहे. आता तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सोडणार की नाही? हे सांगावे, अथवा लिखित द्यावं आम्ही बिहारच्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. हा सगळा खेळ लावला आहे, संपूर्ण देश बघत आहे. असं ते म्हणाले.
तसेच आजच्या दिवस आम्ही वाट पाहणार आहोत, जर विनय तिवारी यांना सोडण्यात आलं नाही तर महाधिवक्ता यांचा सल्ला घेऊ, त्यानंतर बिहार पोलीस आपल्या अधिकाऱ्याला सोडवण्यासाठी कोर्टात जाईल असं डीजीपी यांनी सांगितले आहे. उच्च न्यायालयाच्या सुनावणीवेळी बिहार पोलीस अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करणं चुकीचं आहे असं म्हटलं आहे. उच्च न्यायालय म्हटलं की, मुंबई पोलिसांनी बिहार पोलीस अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करणे योग्य नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतरही विनय तिवारी यांना सोडण्यात आलं नाही. त्यामुळे बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यातील संघर्ष वाढला आहे.
Mumbai Police isn't even following orders of Supreme Court. They must give in writing if they don't want to obey SC order or they should state clearly that they've arrested him: Bihar DGP on Mumbai Police not relieving Patna SP Vinay Tiwari from quarantine.#SushantSinghRajputCasepic.twitter.com/8KiKX7fekE
— ANI (@ANI) August 6, 2020
काय आहे प्रकरण?
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यात वाद रंगला आहे. बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी सुशांतच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आले असता येथील पोलिसांना त्यांना सहकार्य केले नाही. त्यानंतर आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना जबरदस्तीनं क्वारंटाईन करण्यात आले. मुंबई महापालिकेने अद्याप विनय तिवारी यांचे क्वारंटाईन संपवले नाही. त्यानंतर बिहार पोलिसांनी यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.