Sushant Singh Rajput:"...तर राजकीय वळण लागले नसते; माझ्याविरोधात जबाब देण्यासाठी सिद्धार्थवर दबाव"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 06:44 AM2020-08-29T06:44:31+5:302020-08-29T06:44:49+5:30
सुशांतच्या आत्महत्येनंतर आयपीएस ओ.पी. सिंह हे माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी दबाव आणत असल्याचे सिद्धार्थनेच स्वत: फोन करून सांगितल्याचे रियाचे म्हणणे आहे.
मुंबई : सिद्धार्थ पिठानी याला माझ्याविरुद्ध पोलिसांना जबाब देण्यासाठी सुशांतचे नातेवाईक आयपीएस अधिकारी ओ.पी. सिंह यांच्याकड़ून दबाव येत असल्याचा दावा रिया चक्रवर्तीने नुकत्याच केलेल्या मुलाखतीदरम्यान केला आहे.
सुशांतच्या आत्महत्येनंतर आयपीएस ओ.पी. सिंह हे माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी दबाव आणत असल्याचे सिद्धार्थनेच स्वत: फोन करून सांगितल्याचे रियाचे म्हणणे आहे. तेव्हा सिद्धार्थला जे योग्य आहे तेच सांगण्याची मी विनंती केली होती, असे रिया म्हणाली.
सुशांतवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कधीच केला नाही
सुशांतवर मी कधीच नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्या घरात असलेल्या व्यक्तींची नेमणूकही मी केली नाही. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी आधीपासून त्याच्यासोबत राहत होता. तर मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला सुशांतची बहीण प्रियंकाने कामावर ठेवले होते, असे रियाचे म्हणणे आहे.
एनसीबीच्या पथकानेही वाढवला तपासाचा वेग
ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर सीबीआय, ईडीपाठोपाठ आता अमली पदार्थविरोधी पथकानेही (एनसीबी) तपासाचा वेग वाढवला आहे. त्यांनी शुक्रवारी ईडीकड़ून तपासासंबंधित कागदपत्रे ताब्यात घेतलीे. मुंबईसह राज्यभरातील ड्रग कनेक्शनच्या माहितीसाठी एनसीबीच्या पथकाकड़ून माहिती गोळा करण्यात येत आहे. तसेच काही विदेशी तस्करही त्यांच्या रडारवर असून, त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे. सुशांतला ड्रग पुरविणाऱ्याच्या तपासासाठी एनसीबीच्या अधिकाऱ्यांसह खबरीही कामाला लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
थेट तक्रार का केली नाही?
पोलीस अधिकारी असलेल्या ओ.पी. सिंह यांच्या व्हायरल झालेल्या संवादाबाबत बोलताना, सिंह यांनी थेट एखाद्या मुलीला पकडून कारागृहात टाकण्याबाबत बोलणे हे चुकीचे असल्याचे रियाने म्हटले. त्यांना माझा संशय होता तर मुंबईत आल्यानंतर कॉफी शॉपमध्ये खाण्याचा आनंद घेण्यापेक्षा त्यांनी थेट पोलीस ठाण्यात लेखी तक्रार का दिली नाही, असा सवालही तिने केला.
...तर राजकीय वळण लागले नसते
मुंबई पोलिसांनी तातडीने चौकशी करून न्यायदंडाधिकºयांपुढे अहवाल सादर केला असता तर या घटनेला राजकीय वळण लागले नसते. या प्रकरणाचा तपास सीबीआय हाती घेईपर्यंत मुंबई पोलिसांनी रियाची चौकशी केली नाही. मुंबई पोलीस जाणूनबुजून उशीर करत आहे, हेतूपुरस्सर रियाची चौकशी केली जात नाही, असे आरोप मुंबई पोलिसांवर झाले. यामधूनच राजकीय आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आणि काही राजकीय लोक संशयाचे भूत निर्माण करण्यात यशस्वी झाले. मात्र नुसता संशय निर्माण करून कोणी आरोपी होत नाही, असे निकम म्हणाले.
...म्हणून रियाने घराऐवजी गाठले पोलीस ठाणे
सीबीआयच्या १० तासांच्या चौकशीनंतर रात्री नऊ वाजता रिया चक्रवर्ती सीबीआय कार्यालयातून भाऊ शौविकसह जूहूच्या घराकडे आली. मात्र इमारतीबाहेर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी केलेल्या गर्दीमुळे घरी जाता न आल्याने तिने थेट सांताक्रुझ पोलीस ठाणे गाठले. तेथील पोलिसांकडे तिने सुरक्षेची मागणी केली. त्यानुसार सांताक्रुझ पोलिसांनी तिला घरापर्यंत पोहचवले.