सुशांतचा नोकर, मित्राच्या जबाबात विसंगती; सीबीआयकडून फ्लॅटची दुसऱ्यांदा तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 12:55 AM2020-08-24T00:55:02+5:302020-08-24T00:55:22+5:30

सीबीआयच्या १५ जणांच्या पथकाने तपास सुरु करीत शनिवारी कूपर रुग्णालयातील शवविच्छेदन करणारे डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले.

Sushant Singh Rajput: servant, discrepancy in friend's reply; Second inspection of the flat by CBI | सुशांतचा नोकर, मित्राच्या जबाबात विसंगती; सीबीआयकडून फ्लॅटची दुसऱ्यांदा तपासणी

सुशांतचा नोकर, मित्राच्या जबाबात विसंगती; सीबीआयकडून फ्लॅटची दुसऱ्यांदा तपासणी

Next

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेच्या (सीबीआय) विशेष पथकाने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, घरातील नोकर नीरज सिंग आणि केशव उर्फ दीपेश यांची सलग तिसºया दिवशी कसून चौकशी केली. मात्र नीरज आणि दीपेश यांच्या जबाबात काही विसंगती आढळून आल्याने पथकाने दुपारनंतर सुशांतच्या फ्लॅटवर जाऊन ‘क्रॉइम सीन रिक्रिएट’ केला.

सुशांतच्या बंद रूमचे लॉक तोडणाऱ्या रफिक चावीवाल्याचाही रविवारी जबाब नोंदवण्यात आला. तर अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक यांना सोमवारी चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

सीबीआयच्या १५ जणांच्या पथकाने तपास सुरु करीत शनिवारी कूपर रुग्णालयातील शवविच्छेदन करणारे डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले. तसेच सिद्धार्थ, नीरज व दीपेश यांना सोबत घेऊन सुशांत राहत असलेल्या वांद्रे येथील माऊंट ब्लॅक इमारतची सखोल तपासणी करण्यात आली होती. सहाव्या मजल्यावरील त्याचा फ्लॅट, टेरेसचा प्रत्येक कोपरा धुंडाळून काढून मृत्यूचा ‘क्रॉइम सीन रिक्रेएट’ केला होता. सुमारे सहा तासांहून अधिक काळ तेथे तपासणी करण्यात आली होती.

‘अंदर से आवाज आये तो रुक जाना’
सुशांतच्या रूमचे लॉक काढण्यासाठी रफिक चावीवाला अन्य एकाला घेऊन आला होता. तो आल्यानंतर सिद्धार्थ पिठाणीने चावी बनविण्यास वेळ लागणार असल्याने लॉक तोडण्यास सांगितले. तोडताना आतून आवाज आल्यास ‘तुम रुक जाना’, असेही सिद्धार्थने सांगितल्याचा जबाब चावीवाल्याने दिला आहे.

Web Title: Sushant Singh Rajput: servant, discrepancy in friend's reply; Second inspection of the flat by CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.