Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 09:05 PM2020-08-26T21:05:43+5:302020-08-26T21:08:37+5:30
Sushant Singh Rajput Suicide : भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधानसभेत बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनवर चर्चेची मागणी केली आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत आता एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. रिया चक्रवर्ती हिच्या व्हायरल झालेल्या चॅटवर ड्रग्ज कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणावर राजकीय घुरघोड्या करणं सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधानसभेत बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनवर चर्चेची मागणी केली आहे.
आपल्या पत्रात भाजप नेते राम कदम म्हणाले, 'ड्रग्स आणि बॉलिवूड बद्दल वादविवाद आहे हे तुम्हाला माहितीच आहे. मी आपणास बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ड्रग्ज नेक्ससच्या खुलासा होण्यासाठी चौकशीची मागणी करत आहे. तरुण पिढी बॉलिवूड स्टार्सना आपले आयकॉन मानते. अशा परिस्थितीत ड्रग्जविषयी आलेल्या बातम्यांचा त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
#SushantSinghRajputDeathCase the drugs mafia angle is coming to the fore. This is extremely serious and no actor or political leader who are basically icons for youth should indulge in drugs intake. Such political leaders and actors who consume drugs should quit public life #DRUG
— Ram Kadam (@ramkadam) August 26, 2020
भाजप नेते राम कदम म्हणाले, 'मी आपणास अपील करतो की ड्रग्जच्या वापराविषयी आणि त्याच्या नेक्ससवर कारवाई व्हायला हवी आणि विधानसभेच्या या अधिवेशनात बॉलिवूड इंडस्ट्रीत ड्रग्जच्या नेक्ससवर चर्चा केली जाईल आणि योग्य ती कारवाई केली पाहिजे. ट्विटमध्ये राम कदम म्हणाले, 'ड्रग्स माफियांचे अँगल बाहेर येत आहे. हे खूप गंभीर आहे.
भाजप नेते राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'कोणताही अभिनेता किंवा राजकीय नेता जो तरुणांचे प्रतीक नाही, त्याने अमली पदार्थांच्या सेवनात सामील व्हावे. अशा राजकीय नेत्यांनी आणि अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या राजकीय नेत्याने आणि कलाकारांनी सार्वजनिक जीवन सोडून द्यावे.
यापूर्वी एका मुलाखतीत भाजप नेते राम कदम यांनी उद्धव सरकारवर निशाणा साधत विचारले होते की, 'महाराष्ट्र सरकार ड्रग माफियांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, जे चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध चेहरे आहेत आणि जे मोठे नेते आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याचबरोबर जेडीयू नेते संजय सिंह म्हणाले की, या प्रकरणात ड्रग माफिया देखील आहेत आणि ड्रग माफियांशी (रिया चक्रवर्ती) सहभाग आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?