Sushant Singh Rajput suicide case : तपास अद्याप पूर्ण झालेला नाही; पोलिसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 04:09 AM2020-07-15T04:09:13+5:302020-07-15T06:12:55+5:30
सुशांतच्या आत्महत्येला मंगळवार, १४ जुलैला एक महिना पूर्ण झाला. आतापर्यंत ३५ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत.
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू असल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. या प्रकरणी आणखी काही जणांचे जबाब नोंदविणे बाकी असून एका फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा करत असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सुशांतच्या आत्महत्येला मंगळवार, १४ जुलैला एक महिना पूर्ण झाला. आतापर्यंत ३५ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. सुशांतचा शवविच्छेदन अहवालही पोलिसांना मिळाला असून त्यात त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सुशांत प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून ही फाइल पोलीस बंद करण्याच्या तयारीत आहेत, असे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले. मात्र त्याला परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दुजोरा दिलेला नाही.
स्वयंपाकी, बहिणीचीही चौकशी सुशांतचा स्वयंपाकी नीरज याची पोलिसांनी सहा तास चौकशी केल्याचे समजते. मृत्यूच्या तीन ते चार दिवस आधी सुशांतच्या वागणुकीतील बदलापासून ते त्याने काय खाल्ले या सर्वांची माहिती घेण्यात आली. त्याच्या मुंबईतील बहिणीलाही पोलीस ठाण्यात बोलावून तिचीही चौकशी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
आम्ही सध्या एका न्यायवैद्यकीय अहवालाची (फॉरेन्सिक रिपोर्ट) प्रतीक्षा करत आहोत. शिवाय, अजूनही अनेकांचे जबाब नोंदविणे बाकी आहे. याचा नेमका आकडा सध्या सांगता येणार नाही, कारण यासंबंधीचा प्रत्येक धागादोरा अद्यापही पडताळून पाहिला जात आहे. त्यामुळे तपास पूर्ण झाला असे आम्ही म्हणू शकत नाही.
- अभिषेक त्रिमुखे,
पोलीस उपायुक्त, परिमंडळ ९
तपास अद्याप पूर्ण झालेला नाही; पोलिसांची माहितीमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू असल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. या प्रकरणी आणखी काही जणांचे जबाब नोंदविणे बाकी असून एका फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा करत असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सुशांतच्या आत्महत्येला मंगळवार, १४ जुलैला एक महिना पूर्ण झाला. आतापर्यंत ३५ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. सुशांतचा शवविच्छेदन अहवालही पोलिसांना मिळाला असून त्यात त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, सुशांत प्रकरणाचा
तपास पूर्ण झाला असून ही फाइल पोलीस बंद करण्याच्या तयारीत आहेत, असे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले. मात्र त्याला परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दुजोरा दिलेला नाही.
स्वयंपाकी, बहिणीचीही
चौकशी
सुशांतचा स्वयंपाकी नीरज याची पोलिसांनी सहा तास चौकशी केल्याचे समजते. मृत्यूच्या तीन ते चार दिवस आधी सुशांतच्या वागणुकीतील बदलापासून ते त्याने काय खाल्ले या सर्वांची माहिती घेण्यात आली. त्याच्या मुंबईतील बहिणीलाही पोलीस ठाण्यात बोलावून तिचीही चौकशी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
आम्ही सध्या एका न्यायवैद्यकीय अहवालाची (फॉरेन्सिक रिपोर्ट) प्रतीक्षा करत आहोत. शिवाय, अजूनही अनेकांचे जबाब नोंदविणे बाकी आहे. याचा नेमका आकडा सध्या सांगता येणार नाही, कारण यासंबंधीचा प्रत्येक धागादोरा अद्यापही पडताळून पाहिला जात आहे. त्यामुळे तपास पूर्ण झाला असे आम्ही म्हणू शकत नाही.
- अभिषेक त्रिमुखे,
पोलीस उपायुक्त, परिमंडळ ९