Sushant Singh Rajput Suicide : सीबीआयने मुंबई पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवले समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 08:24 PM2020-08-25T20:24:02+5:302020-08-25T20:24:59+5:30
Sushant Singh Rajput Suicide : सुशांतच्या सीए, सिद्धार्थ पिठानीचीही झाडाझडती
मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष पथकाने आता यापूर्वी तपास करणाऱ्या मुंबईपोलिसांच्या कार्यपद्धतीकडे नजर वळविली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यातील या प्रकरणाचे तपास अधिकारी निरीक्षक भूषण बेळणेकर व उपनिरीक्षक वैभव जगताप यांना चौकशीला हजर मंगळवारी समन्स बजाविण्यात आले आहे. त्यांनी केलेला तपास, त्यातील संथगती आणि त्रुटी आदीबाबत त्यांच्याकडे बुधवारी सखोल विचारणा केली जाईल,असे सूत्रांच्याकडून सांगण्यात आले.
दरम्यान, विशेष पथकाने मंगळवारी सुशांतचा लेखा परीक्षक (सीए) संदीप श्रीधर आणि मित्र सिद्धार्थ पिठानी, यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. अधिकाऱ्यांचे वास्तव असलेल्या गेस्ट हाऊस येथे डीआरएच्या संदीप श्रीधर व सुशांतच्या परिचयातील तिघांना चौकशीसाठी केली. ईडीकडून मिळालेला दस्ताऐवज, सुशांतचे बँक अकाउंटचे डिटेल्स, आर्थिक व्यवहार, खर्च, गुंतवणूक, आयटीआरबद्दल सविस्तर तपशील सीएकडून माहिती करून घेतला.
विशेष पथकाने तपासासाठी पाच टीम केल्याअसून सुशांतची आत्महत्या आणि त्याचा वडिलांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने प्रत्येक बाजू व सर्व शक्यता गृहित धरून बारकाईने तपास करण्यात येत आहे. त्यासाठी 14 जूनपासून या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वांद्रे पोलिस अधिकारी बेळणकर, उपनिरीक्षक जगतापकडे सविस्तर विचारणा केली जाणार आहे. दोन महिन्यातील तपास, आणि एफआयआर न घेता केवळ सीआरपी अंतर्गत चोकशी करणे,, 56 जणांचे नोंदविलेले जबाब आदीबाबत त्यांच्याकडे चोकशी केली जाणार असून बुधवारी हजर रहाण्यासाठी नोटीस देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, तपास पथकाने सिद्धार्थ पिठानी याला मंगळवारी सकाळी पुन्हा चौकशी करण्यात आली. त्याप्रमाणे सीए संदीप आणि सुशांतच्या परिचयातील अन्य तिघांकडेही सुमारे सहा तास स्वतंत्रपणे चोकशी केली. त्यांचे जबाब रेकॉर्ड करून घेण्यात आले.
..तर पोलीस उपायुक्त त्रिमुखेचीही चौकशी?
वांद्रे पोलीस ठाण्यातील दोघा तपास आधिकाऱ्यांकडे सीबीआय सविस्तर चौकशी करेल, धिमा तपास, 56 जणांचे जबाबाबात समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता, ते परिमंडळ -8 चे उपयुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्याकडे चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?