सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 02:33 PM2020-07-02T14:33:43+5:302020-07-02T14:35:22+5:30
आता वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना समन्स पाठविले आहे.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात वांद्रे पोलीस अतिशय बारकाईने तपास करत आहेत. सुशांतच्या आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी बर्याच जणांची चौकशी केली जात आहे. आता वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना समन्स पाठविले आहे. भन्साळी यांना पोलिसांनी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे.
सुशांत सिंग राजपूत (३४) याच्या आत्महत्येप्रकरणी अनेक बड्या हस्तीची चौकशी पोलीस करत आहेत. त्यांच्या दबावातून संजय लीला भन्साळीच्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटातून सुशांतला रिप्लेस करत त्याजागी रणवीर सिंगला लीड रोल देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानुसार याप्रकरणी चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याकडे पोलीस चौकशी करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
रामलीला चित्रपटातून सुशांतला काढण्यासाठी चित्रपट निर्मात्यावर कोणी दबाव टाकला होता का याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. रामलीला आणि बाजीराव मस्तानी हे चित्रपट सुशांतला मिळणार होते. मात्र, त्याआधी सुशांतचे यशराज फिल्म्ससोबत करार झाल्याने त्याला त्या चित्रपटात काम करता आले नाही. परिणामी त्याच्यातील नात्यात कटुता आली होती. त्यामुळे यातील तथ्य जाणुन घेण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत आहेत. त्यानुसार अद्याप ३० जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले असून याप्रकरणी अनेकांना समन्स पाठविण्यात आले आहेत. ज्यात भन्साळी यांचाही समावेश असल्याचे समजते. मात्र, याबाबत पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे किंवा वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निखिल कापसे यांच्याकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
भन्साळी यांनी सुशांत ३ चित्रपटांची ऑफर दिली होती
अभिनेता संजय लीला भन्साळी यांनी त्याच्या तीन चित्रपटांसाठी या अभिनेत्याकडे संपर्क साधला असल्याचे चित्रपटाचे समीक्षक सुभाष के झा यांनी सुशांतबद्दल उघड केले. ज्यामध्ये बाजीराव मस्तानी, गोलियां की रसलीला राम-लीला आणि पद्मावत यांचा समावेश होता. सुभाष झा यांनी सांगितले होते की, जेव्हा सुशांत सिंग पानी या चित्रपटाची तयारी करत होता तेव्हा ती फिल्म बनवली नाही. तर सुशांतला बाजीराव मस्तानीची ऑफर देण्यात आली. संजय लीला भन्साळी यांनी मला सांगितले होते. '' पण सुशांतला हा चित्रपट करता आला नाही. त्यानंतर संजय लीला भन्साळीने त्यांना गोलियों की रासलीला राम-लीला आणि नंतर पद्मावतमध्ये भूमिकेची ऑफर दिली. आजच्या काळात संजय लीला भन्साळी हे सर्वात प्रसिद्ध दिग्दर्शक आहे आणि सुशांत त्याचे तीन चित्रपट स्वीकारू शकला नाही.
संजय लीला भन्साळी यांच्याव्यतिरिक्त एंटरटेनमेंट न्यूज पोर्टलचे संपादक असलेले पत्रकार विक्की लालवाणी यांनाही वांद्रे पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात विक्की लालवाणी यांचीही चौकशी केली गेली.
Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना पोलिसांनी बजावले समन्स, बोलावले चौकशीसाठी pic.twitter.com/puEg9rMCug
— Lokmat (@MiLOKMAT) July 2, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ
नियमांचे उल्लंघन: २०२ दुचाकींसह २४५ वाहने वाहतूक शाखेने केली जप्त
पत्नीच्या हत्येप्रकरणी जामिनावर; आमदार अमनमणि त्रिपाठींनी केले दुसरे लग्न
लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
अॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह