...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 03:35 PM2020-08-05T15:35:44+5:302020-08-05T15:36:49+5:30

Sushant Singh Rajput Suicide : अभिनेत्याच्या मृत्यूच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांकडूनही सर्वोच्च न्यायालयाने स्टेटस रिपोर्ट मागविला.

Sushant Singh Rajput Suicide : ... not a good message; SC scolds Bihar police officer for quarantining | ...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांत मृत्यू प्रकरणाची CBI चौकशी केली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी बिहार पोलिसांच्या चौकशीचे नेतृत्व करण्यासाठी मुंबईत आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना क्वारंटाईन केल्याप्रकरणी चांगला मेसेज जात नाही " जेव्हा या प्रकरणात सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे, असे सुप्रीम कोर्टाने आज सांगितले. अभिनेत्याच्या मृत्यूच्या चौकशीसाठी मुंबईपोलिसांकडूनहीसर्वोच्च न्यायालयाने स्टेटस रिपोर्ट मागविला आहे.

 

"मुंबई पोलिसांची चांगली व्यावसायिक प्रतिष्ठा आहे हे असूनही बिहार पोलिस अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करून चांगला मेसेज गेलेला नाही," असे म्हणून सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांचे कान टोचले आहेत. अभिनेता रिया चक्रवर्ती हिने एफआयआर पाटणा पोलिसांकडून मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित करण्याच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने असे मुंबई पोलिसांना खडेबोल सुनावले आहेत. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारकडून बिहार, महारष्ट्र, केंद्र आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या वडिलांबाबत स्टेट्स रिपोर्ट रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी घेताना तीन दिवसांत मागविला आहे.

सुशांत मृत्यूच्या चौकशीचे नेतृत्व करण्यासाठी मुंबईला पाठविलेल्या पाटणा पोलिस अधिकारी विनय तिवारी यांना "जबरदस्तीने" अलग ठेवण्याचे आरोप मुंबई पोलिसांवर करण्यात आले आहेत. सुनावणीदरम्यान, केंद्राने सुप्रीम कोर्टात सांगितले की, अभिनेता सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची बिहार सरकारने केलेली शिफारस त्यांनी मान्य केली आहे. केंद्र सरकारने बिहार सरकारची मागणी मान्य केली आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाची CBI चौकशी केली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी

 

रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या

 

संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात

Web Title: Sushant Singh Rajput Suicide : ... not a good message; SC scolds Bihar police officer for quarantining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.