Sushant Singh Rajput Suicide : ... म्हणून राज्य मानवाधिकार आयोगाने कूपर हॉस्पिटल, मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 12:04 PM2020-08-26T12:04:16+5:302020-08-26T12:12:04+5:30

Sushant Singh Rajput Suicide : चौकशीदरम्यान शवागारमध्ये सुशांतचा मृतदेह पाहण्यासाठी रिया चक्रवर्ती गेल्याचं समोर आलं असून या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणाला शवागारमध्ये जाण्यास मुभा नसते.

Sushant Singh Rajput Suicide: ... So State Human Rights Commission sent notice to Cooper Hospital, Mumbai Police | Sushant Singh Rajput Suicide : ... म्हणून राज्य मानवाधिकार आयोगाने कूपर हॉस्पिटल, मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस

Sushant Singh Rajput Suicide : ... म्हणून राज्य मानवाधिकार आयोगाने कूपर हॉस्पिटल, मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्दे कूपर रुग्णालय प्रशासन आणि मुंबई पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली आहे.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सीबीआयच्या तपासाची चक्रे वेगाने फिरत असून आज सीबीआयच्या तपासाला सहा दिवस झाले आहेत. सीबीआयच्या पथकाने कूपर रुग्णालयातील ज्या डॉक्टरांनी सुशांतचे पोस्टमॉर्टेम केले त्यांची दोनदा चौकशी केली आहे. चौकशीदरम्यान शवागारमध्ये सुशांतचा मृतदेह पाहण्यासाठी रिया चक्रवर्ती गेल्याचं समोर आलं असून या प्रकरणात मुंबईपोलिसांच्या परवानगीशिवाय कोणाला शवागारमध्ये जाण्यास मुभा नसते. त्यामुळे रिया कशी गेली. मुंबई पोलिसांनी तिला परवानगी दिली होती की नाही यावर प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे कूपर रुग्णालय प्रशासन आणि मुंबई पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली आहे.

रियाच्या अडचणी दिवसागणित वाढ होताना दिसत आहेत. अमली पदार्थप्रकरणी आता रियाची एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) देखील चौकशी करू शकते. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याची मुख्य संशयित अभिनेत्री रिया चक्रवती हिचा अमलीपदार्थ  सेवन व तस्करीत सहभाग असल्याचा संशय सक्तवसुली संचालनालयाला (ईडी ) आहे.  तिच्या मोबाईल डाटा तपासणीतून त्यानुषंगाने काही माहिती मिळाली असून त्याच्या मुळापर्यत जाऊन तपास करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. रियाकडून जप्त केलेल्या दोन मोबाईलपैकी एकामधील व्हाट्सअपचॅटमध्ये अमली पदार्थाबाबत अस्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे ड्रग्जचे सेवन व ती मागविण्यात तिचा  कनेक्शन आहे का, या अनुषंगाने तपास केला जात आहे. त्याबाबत माहिती मिळविण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकालाही  कळविण्यात आले आहे.

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

Web Title: Sushant Singh Rajput Suicide: ... So State Human Rights Commission sent notice to Cooper Hospital, Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.